Imran Khan warns of internal war in Afghanistan
Imran Khan warns of internal war in Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

'... तर अफगाणिस्तानात गृहयुद्ध' इम्रान खान यांचा इशारा

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी आता अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गृहयुद्धाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. इम्रान खान यांनी याबाबत बोलताना जर तालिबान (Taliban Government) अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार बनवू शकले नाही तेव्हा हा धोका होईल असे सांगितले आहे . बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, जर त्यांच्याकडे सर्वसमावेशक सरकार नसेल तर हळूहळू देश गृहयुद्धाकडे वाटचाल करत आहे. जर त्यांनी सर्व गटांचा समावेश केला नाही तर ते लवकरच होऊ शकते. याचा परिणाम पाकिस्तानवरही (Pakistan) होणार असल्याची भीती देखील इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. (Imran Khan warns of internal war in Afghanistan)

इम्रान म्हणाले की अफगाणिस्तानात जर गृहयुद्ध सुरू झाले तर पाकिस्तान प्रामुख्याने मानवतावादी आणि निर्वासितांच्या संकटाच्या शक्यतेबद्दल चिंतित आहे. त्याच वेळी, अफगाणिस्तानची जमीन पाकिस्तान सरकारशी लढणाऱ्या सशस्त्र गटांकडून वापरली जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, याचा अर्थ अफगाणिस्तान अस्थिर आणि गोंधळलेल्या अवस्थेत जाईल. जर नव्या सरकारनचे धोरण योजि नसेल तर अफगाणिस्तान दहशतवादासाठी एक मोठे ठिकाण बनेल, कारण जर तेथे सरकारचे नियंत्रण नसेल आणि तेथे लढाई झाली तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद फोफावेल. त्याच वेळी, जर मानवतावादी संकट किंवा गृहयुद्ध असेल तर आपल्यासाठी निर्वासितांचा प्रश्न निर्माण होईल.

सध्याच्या अंतरिम अफगाणिस्तान सरकारमध्ये बदल करण्याची इम्रानची विनंतीही तालिबानने नाकारली आहे. तालिबानचे नेते मोहम्मद मोबिन म्हणाले की, सर्वसमावेशक सरकार बनवण्यासाठी पाकिस्तानला बोलण्याचा अधिकार नाही. ते म्हणाले, आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामुळे सरकार स्थापनेसाठी स्वतंत्र असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तालिबानचे उपसूचना मंत्री जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, जेव्हा देशाला अधिकृतपणे मान्यता मिळाली तर हा गट आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांच्या समस्यांचे निराकरण देखील करेल.

गेल्या आठवड्यात इम्रान खान म्हणाले की त्यांनी तालिबानशी काबूलमध्ये सर्वसमावेशक सरकारसाठी चर्चा सुरू केली आहे ज्यात ताजिक, हजारा आणि उझ्बेक समुदायाचे लोक असतील.एक दिवस आधी, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) सदस्य देशांनी सांगितले की युद्धग्रस्त देशात सर्वसमावेशक सरकार असणे महत्वाचे आहे, ज्यामध्ये सर्व जातीय, धार्मिक आणि राजकीय गटांचे प्रतिनिधी असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

SCROLL FOR NEXT