Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: इम्रान खानच्या पक्षाचा झेंडा घरावर फडकवला; डाव्या विचारसरणीच्या बापाने केली मुलाची हत्या

Pakistan Election: निवडणुकीच्या रणधुमाळीत पाकिस्तानात हत्या आणि अपहरणाच्या घटना वाढत आहेत.

Manish Jadhav

Pakistan Election: निवडणुकीच्या रणधुमाळीत पाकिस्तानात हत्या आणि अपहरणाच्या घटना वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये राजकीय मतभेदांवरुन एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा फडकावायचा यावरुन पिता-पुत्रांमध्ये भांडण झाले. याचा राग येऊन पित्याने मुलाची हत्या केली. पाकिस्तानच्या पेशावर पोलिसांनी ही माहिती दिली.

पिस्तुलाने पित्याने मुलाचा खून केला

एएफपीच्या वृत्तानुसार, मुलगा नुकताच कतारमधून कामावरुन परतला होता. त्याने खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर येथील त्याच्या घरी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचा झेंडा फडकावला होता. यावरुन पिता-पुत्रांमध्ये वादावादी झाली. जिल्हा पोलीस अधिकारी नसीर फरीद म्हणाले की, "वडिलांनी आपल्या मुलाला घरावर पीटीआयचा झेंडा फडकावण्यास मनाई केली होती, परंतु मुलाने तो उतरवण्यास नकार दिला. त्याने पीटीआय सोडणार नसल्याचेही सांगितले होते."

दुसरीकडे, मुलाने नकार दिल्याने वाद वाढला आणि रागाच्या भरात वडिलांनी आपल्या 31 वर्षीय मुलावर गोळी झाडली, असे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयात नेत असताना मुलाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, पोलीस वडिलांचा शोध घेत आहेत. आरोपी वडिलांबद्दल असे बोलले जात आहे की, ते राष्ट्रवादी अवामी नॅशनल पार्टी (ANP) शी संबंधित होते. त्यांनी आपल्या घरावर अवामी पक्षाचा झेंडाही फडकवला होता.

दुसरीकडे, अवामी नॅशनल पार्टीबद्दल बोलायचे झाल्यास हा पाकिस्तानमधील पश्तून राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष आणि डाव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1986 मध्ये अब्दुल वली खान यांनी केली होती आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष बाचा खान यांचे नातू अस्फंदयार वली खान आहेत. जग बाचा खान यांना खान अब्दुल गफार खान किंवा बादशाह खान म्हणून ओळखते. भारतात अब्दुल गफार खान यांना 'फ्रंटियर गांधी' किंवा 'सरहद्द गांधी' असेही म्हणतात. पश्तूनांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बादशाह खान यांना 1987 मध्ये भारत सरकारने सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित केले होते.

आमच्या उमेदवारांचे अपहरण केले जात आहे – इम्रान खान यांचा पक्ष

तसेच, 8 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकांपूर्वी पाकिस्तानात प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळीही हिंसाचार सुरुच आहे. उमेदवारांवर बॉम्बस्फोट आणि बंदुकींनी हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने 19 जानेवारी रोजी एका निवेदनात दावा केला होता की, 8 फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी गुप्तचर संस्था त्यांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांना उघडपणे त्रास देत असून त्यांचे अपहरण करत आहेत.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, फैसलाबादचे माजी आमदार आणि पक्ष समर्थित उमेदवार खयाल अहमद कॅस्ट्रो यांचे गुप्तचर संस्थांच्या कर्मचार्‍यांनी अपहरण केले आहे. लाहोरपासून फैसलाबाद 130 किलोमीटर अंतरावर आहे. खान यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, फैसलाबाद येथील जिल्हा न्यायालयाबाहेर साध्या वेशातील लोकांनी कॅस्ट्रोचे अपहरण केले. पक्षाचे सरचिटणीस उमर अयुब म्हणाले की, "कोर्टातून जामीन मिळूनही, कॅस्ट्रो यांचे दिवसाढवळ्या अज्ञात लोकांनी अपहरण केले, जे अत्यंत निंदनीय आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

SCROLL FOR NEXT