Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

'...म्हणून इम्रान खान यांच्याकडे आकर्षित व्हायच्या महिला'

इम्रान खान (Imran Khan) हे गेल्या दोन दशकांपासून राजकारणी म्हणून ओळखले जातात.

दैनिक गोमन्तक

इम्रान खान हे गेल्या दोन दशकांपासून राजकारणी म्हणून ओळखले जातात. परंतु राजकारणाच्या खेळपट्टीवर 'फलंदाजी' करण्यापूर्वी इम्रान खान हे यशस्वी क्रिकेटपटू ठरले आहेत. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत इम्रान खान (Imran Khan) यांची गणना एक प्लेबॉय म्हणून केली जात होती, ज्यांचे किती सुंदरींशी संबंध होते हे मात्र माहित नाही. परंतु आज ते एक गंभीर राजकारणी आणि धार्मिक व्यक्ती म्हणून ओळखले जातात. परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांची गणना प्लेबॉय सेलिब्रिटी (Imran Khan Playboy) म्हणून केली जात होती.

दरम्यान, इम्रान तरुणपणात एक शांत आणि लाजाळू मुलगा होता, परंतु त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत तो सेलिब्रिटी प्लेबॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. क्रिकेटच्या दिवसांमध्ये, इम्रान त्याच्या रोमँटिक मूडमुळे मिडीयामध्ये नेहमीच चर्चेत असायचा. वृत्तपत्रात रोज त्याचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री किंवा मॉडेलशी जोडले जायचे. इम्रान खान हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे बालपण लाहोरमध्ये गेले. नंतर त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून (Oxford University) उच्च शिक्षण पूर्ण केले. मात्र, अभ्यासात विशेष रस नसलेला इम्रान क्रिकेटच्या खेळपट्टीवर जबरदस्त चमकला आणि त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 चा क्रिकेट विश्वचषक जिंकला.

इम्रान खान यांचे कोणत्या सुंदरींशी संबंध होते?

डीएनएच्या रिपोर्टनुसार, इम्रान खान यांचे बॉलिवूडमधील बडी अभिनेत्री रेखासोबत संबंध होते. वास्तविक, इम्रान जेव्हा मुंबईत यायचे, त्यावेळी रेखा आणि ते एकमेकांसोबत अनेकदा दिसले होते. त्याचबरोबर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानचेही इम्रान खानवर प्रेम असल्याची अफवाही पसरली होती. पाकिस्तानचा (Pakistan) संघ नोव्हेंबर 1979 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावर्षी, इम्रान यांनी बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत 27 वा वाढदिवस साजरा केला होता. परंतु इम्रान यांनी झीनत अमानसोबत वाढदिवस साजरा केल्याचा दावा काही भारतीय वृत्तपत्रांनी केला आहे.

याशिवाय, इम्रान खान यांचे नाव बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीसोबतही जोडले गेले होते. जरी दोघे त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलले नाहीत. इम्रान खान आणि बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन यांच्यातील जवळीकतेमुळे बरीच चर्चा झाली. इम्रान खान यांना मुनमुन सेन आवडत असल्याचं म्हटलं जात होतं. इम्रान यांच्याबद्दल या गोष्टीही बोलल्या जात होत्या की, ते बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये खूप पॉप्युलर होते. त्याच वेळी, माजी अमेरिकन मॉडेल मेरी हेल्विनने इम्रानबद्दल सांगितले होते की, त्याच्यामध्ये काहीतरी आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्याच्याकडे आकर्षित होतो. त्याच्याकडे एक सेंट आहे, जो महिलांसाठी खूप आकर्षक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

SCROLL FOR NEXT