Pakistan's Prime Minister Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान सरकार लवकरच बलुच बंडखोरांशी करणार चर्चा !

चीनने (China) पाकिस्तानला (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) शांतता प्रस्थापित करण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan's Prime Minister Imran Khan) यांनी सोमवारी संकेत दिले की ते लवकरच, बलुचिस्तानमधील (Balochistan) बंडखोरांशी चर्चा करु शकतात. इम्रान खान यांनाी हा विचार व्यक्त केला आहे. बलुचिस्तानमध्ये भारताच्या (India) समर्थनार्थ आवाज उठवले जात आहेत. त्याचवेळी चीनने (China) या क्षेत्रात बरीच मोठी गुंतवणूक केली आहे, आणि चीनने पाकिस्तानला बलुचिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा इशारा दिला आहे. आधीच्या सरकारांनी बलुचिस्तानमधील उग्रवाद थांबवण्यासाठी योग्यप्रकारे कार्यवाही न केल्याचा आरोप इम्रान खान यांनी करत म्हटले की, त्यांनी या प्रदेशात विकास कामे योग्यप्रकारे केली नाहीत.

बलुचिस्तान प्रांत बर्‍याच काळापासून फुटीरतावादी बंडखोरीचा सामना करत आहे. बलुचिस्तानमधील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अलिकडच्या वर्षांत हजारो कार्यकर्ते बेपत्ता झाले आहेत आणि पाकिस्तानी सैन्य स्वायत्ततेसाठी या भागाच्या आकांक्षा निर्दयपणे दाबून टाकत आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ग्वादारमधील भेटीदरम्यान स्थानिक नेते, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना संबोधित करताना इम्रान म्हणाले की, बलुचिस्तानमधील बंडखोरांशी बोलण्याचा विचार आहे. बलुचिस्तानमधील अशांतता हा गरीबी आणि मागासलेपणाशी निगडित आहे आणि देशातील कोणत्याही सरकारने या भागाच्या विकासाकडे लक्ष दिले असते तर उग्रवादाची चिंता करण्याची गरज राहीली नसती.

प्रांतातील अशांततेसाठी मागील सरकारांना दोष द्या

इम्रान खान पुढे म्हणाले की, आम्ही बलुचिस्तानला सर्वात मोठे पॅकेज दिले कारण आमचा विश्वास आहे की, बलुच जनतेशी खऱ्या अर्थाने न्याय झाला नाही आणि त्यामुळे लोक मागास राहत गेले. आधीच्या सरकारवर टीका करत इम्रान म्हणाले, पूर्वी बलुचिस्तानच्या विकासाच्या नावावर देशाचा पैसा राजकारण्यांनी स्वतः ची झोळी भरण्यासाठी वापरला. खान पुढे म्हणाले, बलुचिस्तानमधील लोकांमध्ये वंचित राहण्याची भावना पसरु लागली आहे. बलुचिस्तानमधील नेत्यांनी पैशांचा योग्य प्रकारे वापर केला असता तर ही भावना प्रांतात कधीही पसरली नसती. हेच कारण आहे की त्यांना बंडखोराबद्दल तक्रारी असाव्यात.

इम्रान खान बंडखोरांशी बोलण्यास तयार का आहेत?

बलुचिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक चीनने केली आहे. वस्तुतः चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (सीपीईसी) च्या माध्यमातून ग्वादर हे प्रमुख बंदर विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पात चीनने 62 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. परंतु या प्रांतातील अशांततेमुळे प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चीन सतत पाकिस्तानला या भागात शांतता निर्माण करण्यास सांगत आहे. दुसरीकडे, बलुचिस्तानमधून भारताच्या समर्थनार्थ आवाज उठत आहेत. इथले लोक पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीपासून वाचण्यासाठी भारताकडे मदतीची हाक देत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांची झोप उडाली आहे. याच कारणामुळे आता इम्रान खान सरकारला बलुचिस्तानमधील बंडखोरांशी संवाद साधायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT