Donald Lu Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान सरकार पाडण्याचा कट रचणारे डोनाल्ड लू कोण? भारतातही केले काम

पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राजनयिक अधिकारी डोनाल्ड लू (Donald Lu) यांनी आपले सरकार पाडण्याचा कट रचला असल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानातील राजकीय संकटाच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राजनयिक अधिकारी डोनाल्ड लू यांनी आपले सरकार पाडण्याचा कट रचला असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या (America) परराष्ट्र खात्यातील दक्षिण आशियाई घडामोडींवर देखरेख करणारे सर्वोच्च अमेरिकी राजनयिक डोनाल्ड लू यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे आपले सरकार उलथून टाकायचे होते, असा दावा इम्रान खान (Imran Khan) यांनी केला आहे. डोनाल्ड लू (Donald Lu) यांनी अमेरिकेतील पाकिस्तानचे (Pakistan) राजदूत असद मजीद यांच्यामार्फत धमकीचे पत्रही पाठवले आहे. डॉन वृत्तपत्राने इम्रान खान यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'अमेरिकेने पाकिस्तान राजदूताच्या माध्यमातून धमकीचा संदेशही पाठवला होता.' (Imran Khan claimed US diplomat Donald Lu wanted to overthrow his government through a no-confidence motion)

इम्रान खान म्हणाले की, अमेरिकन राजदूताने पाकिस्तानच्या राजदूताला धमकी दिली होती. जर पाकिस्तानी पंतप्रधानांनी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याचे टाळले तर त्याचे "गंभीर परिणाम" होतील. आपल्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव हा 'षड्यंत्र' होता आणि अल्लाहच्या कृपेमुळे तो अयशस्वी ठरला.

इम्रान पुढे म्हणाले की, ''जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने (NSC) अविश्वास प्रस्तावात बाहेरील शक्तींच्या सहभागाचा निषेध केला होता, तेव्हा मतदान (Opinions on the motion of no confidence) "अप्रासंगिक" बनले होते. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे ( PTI) बंडखोर नेते अमेरिकन दूतावासात जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे.''

ते पुढे म्हणाले, 'काय कारण आहे की, जे आम्हाला सोडून गेले आहेत. ते गेल्या काही दिवसांत दूतावासातील लोकांना वारंवार भेटत आहेत.'

डोनाल्ड लू कोण आहे?

डोनाल्ड लू हे अमेरिकन परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. ज्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ यूएस सरकारची सेवा केली आहे. 2010 ते 2013 पर्यंत त्यांनी भारतातील यूएस मिशनचे उपप्रमुख म्हणून काम केले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटमध्ये दक्षिण आशियाई घडामोडींसाठी सहाय्यक परराष्ट्र सचिव म्हणून, लू हे राज्य विभागातील उच्च राजनयिक अधिकारी आहेत, जे या प्रदेशावर लक्ष केंद्रित करतात. त्यांनी किर्गिझस्तान आणि अल्बेनियामध्ये राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी नवी दिल्लीतील यूएस दूतावासात दोन वेगवेगळ्या टप्प्यात काम केले आहे.

त्याचबरोबर, लू यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आशियाई व्यवहार खात्याचे सहाय्यक सचिव बनवण्यात आले होते. त्यांनी यापूर्वी 2018 ते 2021 पर्यंत किर्गिस्तानमध्ये आणि 2015 ते 2018 पर्यंत अल्बानियामध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले आहे. अल्बानियामध्ये पोस्टिंग करण्यापूर्वी, लू यांनी पश्चिम आफ्रिकेतील इबोला संकटाच्या वेळी उप समन्वयक म्हणून राज्य विभागात काम केले. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला मध्य आशियाई आणि दक्षिण कॉकेशस अफेयर्स, ब्युरो ऑफ युरोपियन अफेअर्स (2001-2003) कार्यालयात उपसंचालक म्हणून काम केले.

डोनाल्ड लू यांनी 1997 ते 2000 पर्यंत भारतात राजकीय अधिकारी म्हणून काम केले. तिथे असताना त्यांनी 1996-1997 मध्ये नवी दिल्लीतील यूएस राजदूतांचे विशेष सहाय्यक म्हणून काम केले. याव्यतिरिक्त, 1992 आणि 1994 मध्ये पेशावरमध्ये राजकीय अधिकारी म्हणून काम केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT