Imran Khan
Imran Khandainik gomantak

Pakistan Political Crisis: विकेट घेणाऱ्या इम्रान खान यांचीच पडली विकेट

5 वर्षे सत्तेचा दावा करणाऱ्या इम्रान खान यांना करावी लागली संसद बरखास्त
Published on

Pakistan Political Crisis: पाकिस्तानवर राजकीय संकट आढावल्यानंतर आता फक्त 24 तासांत पाकिस्तानच्या राजकारणात चेहरे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नसून ते मात्र 15 दिवस काळजीवाहू पंतप्रधान राहतील. इम्रान खान यांच्या शिफारशीवरून संसद बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तान जनतेला पुन्हा निवडणूकीला सामोरं जावं लागणार आहे. (Imran Khan was de-notified as the Prime Minister of Pakistan)

काय झालं असं 24 तासात

उपसभापती कासिम सूरी यांनी पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यांनी अविश्वास प्रस्तावाला 'परकीय षडयंत्र' म्हणत फेटाळले. कासिम सूरी म्हणाले की, पंतप्रधानांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव 'असंवैधानिक' आहे. त्यांनी सभागृहाचे कामकाज 25 एप्रिलपर्यंत तहकूब केले.

त्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली. त्यांनी विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस केली. इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर आरिफ अल्वी यांनी कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्ली (National Assembly) विसर्जित केली. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर इम्रान यांनी देशाला संबोधित करताना अविश्वास प्रस्तावाला 'परकीय षड्यंत्र' म्हटले. त्यानंतर इम्रान खान अधिकृतपणे पंतप्रधानपदावरून पायउतार झाले.

Imran Khan
Sri Lanka Economic Crisis: PM Mahinda Rajapaksa यांच्या मंत्रिमंडळातील सार्‍यांचा राजीनामा

दरम्यान याप्रकरणी विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाऊन दाद मागण्याची तयारी केली असतानाच आता सर्वोच्च न्यायालयानेच स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळताना आणि संसद (Assembly) बरखास्त करताना घटनात्मक प्रक्रियेचे पालन केले गेले की नाही याचा निर्णय आता सरन्यायाधीश घेणार आहेत.

तर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून इम्रान खान हे फक्त 15 दिवस राहतील. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची तरी नियुक्ती केली जाईल. मात्र त्यानंतर पुढील 90 दिवसांत पाकिस्तानमध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तर विसेष बाब म्हणजे येणारी निवडणूक ही ईव्हीएमने (EVM) होणार नसल्याचे शेख रशीद म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com