Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचे नशीबही फुटके, IMF ने पुन्हा दिला मोठा दणका; आता डिफॉल्ट होण्यापासून...

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असलेला पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या नशिबाला कोसत आहे. पाकिस्तानने आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडला, मात्र पुन्हा तीच चूक केली, ज्यामुळे पुन्हा एकदा IMF ने मोठा दणका दिला आहे.

त्याचवेळी, शाहबाज शरीफ यांच्या पिग्गी बँकेत चिल्लरच खणखणत आहे, परंतु देशाची दुरवस्था दूर करु शकणारी तिजोरी रिकामीच आहे.

दरम्यान, शाहबाज शरीफ यांचे सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे फेल ठरले आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. याचा पुरावाही सादर केलेल्या अर्थसंकल्पाने दिला आहे.

पाकिस्तानमध्ये (Pakistan) अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तेथील जनता शाहबाज सरकारची खिल्ली उडवत आहे. सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या दाव्यांवर पाकिस्तानातील माध्यमांचाही विश्वास नाही.

IMF ला डोळे दाखवणे जड गेले

पाकिस्तानने 2023-24 साठी एकूण 14.46 ट्रिलियन रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पण महागाईला तोंड देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, याचा अर्थ गरिबांसाठी बजेटमध्ये काहीच नाही.

महागाई (Inflation) कमी करणे आणि डॉलरवर नियंत्रण ठेवणे हे सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. गेल्या 1 वर्षात डॉलरची किंमत जवळपास 100 रुपयांनी वाढली आहे. एकेकाळी IMF ला डोळे दाखवणारे इशाक दार आता प्लॅन बी बद्दल बोलत आहेत.

महागाई नियंत्रणात आणता आली नाही

पाकिस्तान हा आशियातील सर्वाधिक महागाई असलेला देश बनला आहे. पीडीएम सरकार दीड वर्षानंतरही महागाई नियंत्रणात आणू शकलेले नाही. गेल्या अर्थसंकल्पात याच सरकारने महागाईचा दर 11.30 टक्के ठेवला होता, तो आता 29 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पाकिस्तान भुकेने त्रस्त आहे

पाकिस्तानी तज्ज्ञांनी सांगितले की, बजेटमध्ये कोणताही नवीन कर समाविष्ट करण्यात आलेला नाही. मात्र महागाई, आर्थिक संकट आणि उपासमारीने त्रस्त असलेल्या पाकिस्तान सरकारने संरक्षण बजेटमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे.

यावेळी संरक्षण बजेट 1.8 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे, जे मागील वेळेपेक्षा 15.4 टक्के अधिक आहे. गेल्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ती आता 284 अब्ज रुपयांनी वाढून 1.8 लाख कोटी झाली आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे पाकिस्तानी जनता दोन वेळच्या भाकरीसाठी चिंतेत आहे. असे असतानाही संरक्षण बजेट वाढवण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयएमएफने पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तानकडे गरिबीतून मुक्त होण्याचा आणि डिफॉल्ट टाळण्याचा कोणताही मार्ग नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT