Know How To Register Online Complaint in Prime Minister's Office (PMO) | Dainik Gomantak Marathi News Dainik Gomantak
ग्लोबल

PMO Complaint Registeration Portal: सरकारी काम अडलंय, कोणी त्रास देतंय? मदत मिळत नसल्यास थेट PM मोदींकडे करा ऑनलाईन तक्रार

Prime Minister's Office Complaint Registeration Portal Online: अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये काम होण्यास कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे विलंब झाल्यास तुमची चिडचीड होते.

Manish Jadhav

PMO Complaint Registeration Procedure:

अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये काम होण्यास कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे विलंब झाल्यास तुमची चिडचीड होते. तुम्ही त्याबाबत वरिष्ठ अधिकारी किंवा पोलिसांकडे तक्रार करता, पण तुमची तक्रार ऐकली जात नाही. अशा स्थितीत तुमची तक्रार ऐकण्यासाठी कोणीच उपस्थित नाही असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही निराश होतात. पण यापुढे असे होणार नाही, कारण आम्ही तुम्हाला कोणत्याही समस्येची तक्रार पंतप्रधान कार्यालयात कशी करायची याबद्दल सांगत आहोत.

दरम्यान, एकदा तुम्ही पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली तर योग्य ती कारवाई तर केली जाईलच, पण भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाईल. तुम्ही ही तक्रार ऑनलाइन करु शकता.

पंतप्रधान कार्यालयात तक्रार कशी करणार?

पंतप्रधान कार्यालयात तक्रार नोंदवण्यासाठी एक वेबसाइट देण्यात आली आहे, ती https://www.pmindia.gov.in/hi. तुम्ही या वेबसाइटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता, यासाठी तुम्हाला 'चॅट विथ द प्राइम मिनिस्टर टॅप'वर जावे लागेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पंतप्रधानांना पत्र लिहण्याचा पर्याय मिळेल. यानंतर, तुमच्या समोर CPGRAMS चे पेज ओपन होईल, जिथे तक्रार नोंदवली जाते आणि तक्रार दाखल केल्यानंतर, एक रजिस्ट्रेशन नंबर येतो. तक्रारीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्यायही नागरिकांना आहे. यामध्ये तुम्ही तुमची विनंती केलेली माहिती भरा, ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि तुमच्या तक्रारीची माहिती समाविष्ट आहे.

तुम्ही तुमची तक्रार लिखित स्वरुपातही पाठवू शकता

दरम्यान, तुम्हाला ऑनलाइन तक्रार करायची नसेल, तर तुम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून भारतीय टपाल विभागामार्फत तुमची तक्रार पाठवू शकता. यासाठी तुम्हाला पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन 110011 वर तक्रार पत्र लिहावे लागेल. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार फॅक्सद्वारे फॅक्स क्रमांकावर पाठवू शकता. तुम्ही ते पंतप्रधान कार्यालयाला 011-23016857 या क्रमांकावर पाठवू शकता.

कारवाई कशी होते?

तक्रारींची चौकशी करुन त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक टीम आहे. जी विविध मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांशी समन्वय साधते. तुमची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते त्याची चौकशी करतात आणि तुमची तक्रार खरी असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "ते म्हणणं शाब्दिक अर्थाने घेऊ नका", सत्यविजय नाईकांचे 'बॅकस्टॅबिंग'; दामू नाईकांचे स्पष्टीकरण

'बर्च' प्रकरणी सह-मालक अजय गुप्ताला 5 दिवसांची पोलीस कोठडी; बनावट प्रमाणपत्रे आणि फसवणुकीचा पर्दाफाश

Rohit Sharma Century: 'हिटमॅन'चा झंझावात! रोहित शर्मानं ठोकलं वादळी शतक; सचिन-विराटच्या 'स्पेशल' क्लबमध्ये सामील VIDEO

Goa Politics: 'फ्रेंडली फाईट' ही संकल्पनाच मला मान्य नाही; 2027 साठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आलेमाव यांचे मोठे वक्तव्य

Gold Silver Rate: इतिहासात पहिल्यांदाच! 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.38 लाखांच्या पार, तर चांदी सव्वा दोन लाखांवर; आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT