Jim Mattis dainik gomantak
ग्लोबल

Jim Mattis:...तर चीन भारतावर हल्ला करू शकतो, अमेरिकेच्या माजी संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

रायसीना डायलॉग या कार्यक्रमात जिम मॅटिस बोलत होते.

Pramod Yadav

रशिया युक्रेन युद्धावर चीन बारीक लक्ष ठेवून आहे. रशिया जर युक्रेनच्या युद्धात यशस्वी झाले तर चीन LAC वरून भारतावर हल्ला करू शकतो. अशी चिंता अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी व्यक्त केली आहे. रायसीना डायलॉग या कार्यक्रमात जिम मॅटिस बोलत होते.

अमेरिका चीनचा सामना करण्यास तयार आहे का? असा प्रश्न जिम मॅटिस यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मॅटिस यांनी 'चीन तयार आहे यात अजिबात शंका नाही,' असे खोचक उत्तर दिले. तसेच, 'रशिया विरोधात अमेरिका युक्रेनला मदत करत राहील,' असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

'युक्रेनमध्ये रशियाला यश मिळाले तर चीन भारताविरुद्ध अशी भूमिका का घेणार नाही? चीन या सर्व हलचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. असे मॅटिस म्हणाले. रशिया युक्रेनविरोधात तीन आठवड्यात जिंकला असता, पण पाश्चात्य देशांच्या मदतीने युक्रेनने रशियाला माघार घेण्यास भाग पाडले,' असेही मॅटिस यावेळी म्हणाले.

जिम मॅटिस यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. मॅटिस म्हणाले की, 'पुतीन यांनी यापूर्वीही याबाबत वक्तव्य केले असल्याचे आम्ही पाहिले आहे. परंतु अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्या करारावर पुन्हा बोलायला हवे. दरम्यान, मजबूत भारतच जगात शांतता प्रस्थापित करू शकतो,' असेही जिम मॅटिस म्हणाले.

या कार्यक्रमावेळी भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल अनिल चौहान आणि ऑस्ट्रेलियन लष्कराचे जनरल एंगस जे कॅम्पबेल हे देखील उपस्थित होते.

रशिया-युक्रेन युद्ध बेकायदेशीर आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे ऑस्ट्रेलियन जनरल एंगस म्हणाले.

'युद्धातून अनेक धडे शिकायला मिळत असतात. सर्व जगाला हा नियम लागू होतो असे नाही पण, भारतावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरते. या लढाईचा सर्वात मोठा धडा म्हणजे आपल्याला स्वावलंबी व्हायचे आहे.' असे भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT