Dating App Dainik Gomantak
ग्लोबल

'मला Girlfriend बनवायचं असेल तर...', महिलेने Dating Site वर घातली एक विचित्र अट

एका महिलेने डेटिंग अॅपवर आपल्या बायोमध्ये लिहिलेला मॅसेज हा चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमन्तक

Trending News: अनके लोक हे डेटिंग अ‍ॅपचा वापर करतात. अलिकडेच एक अशी बातमी समोर आली आहे जी डेटिंग अ‍ॅपशी संबंधित आहे. वारंवार रिलेशनमध्ये निराशा मिळाल्यामुळे महिलेने 'Hinge' या डेटिंग अ‍ॅपवर तिच्या प्रोफाइलवर टाकलेली विचित्र अट व्हायरल होत आहे.  या महिलेचे नाव लॉरेन आहे. तिने तिच्या प्रोफाइलच्या बायोमध्ये लिहिले आहे की, ज्याला तिला डेटवर घेऊन जायचे आहे त्याने अर्ज द्यावा लागेल आणि तिने त्याच्यासोबत डेटवर का जावे यावर 500 शब्दांचा निबंध लिहावा लागेल.

महिलेने तिच्या प्रोफाईलमध्ये लिहिले आहे की, जर मला गर्लफ्रेंड बनवायचं असेल तर असा निबंध लिहा आणि द्या म्हणजे तुमच्यासोबतचा माझा वेळ वाया जाणार नाही. इंग्लंडमधील पोर्ट्समाउथ येथे राहणारी लॉरेन एका मुलीची आई आहे आणि 10 वर्षांच्या मुलीच्या वडिलांसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती अविवाहित आहे. 

लॉरेन ही ३६ वर्षाची असुन तिने हे सर्व मजेशीरपणे लिहिले असले तरी तिला लोकांचा प्रतिसाद मिळाला. एका व्यक्तीने तिला आवेदनही दिले आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही दिले. या व्यक्तीने प्रभावित झाल्यानंतर लॉरेन त्याला भेटायला गेली. पण हे नाते पुढे वाढू शकले नाही. 

स्किन केअर क्लिनिकमध्ये काम करणारी लॉरेन म्हणाली - डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून कोणाशीही रिलेशनशिपमध्ये असताना माझा अनुभव अजिबात चांगला राहिला नाही. काही डेट खूप कंटाळवाण्या होत्या, जरी मी गमतीने ही अट घातली आहे .

परंतु मला आनंद आहे की काही लोकांनी खरोखर प्रयत्न केले आणि त्यासाठी आवेदन केले. याद्वारे एखाद्याची मजेदार बाजू देखील पाहू शकते आणि मी त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. लॉरेनने सांगितले की, सध्या मी डेटिंग अॅपमधून ब्रेक घेतला आहे, पण आता मला पुन्हा पुरुषांवर विश्वास बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT