Elisheva Rose Ida Lubin|Israel Hamas War DAINIK GOMANTAK
ग्लोबल

Israel Hamas War: इस्रायली सैन्यातील अमेरिकन तरुणीची हत्या करणाऱ्या पॅलेस्टिनी मुलाला IDF ने केले ठार

Elisheva Rose Ida Lubin: इस्रायली संरक्षण दलाने निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या छाप्यादरम्यान महिला सैनिकावर हल्ला करणाऱ्या मुलाला शोधून ठार केले. या वेळी इस्रायली सैनिक आणि स्थानिक पॅलेस्टिनी यांच्यात चकमकीही झाल्या.

Ashutosh Masgaunde

IDF Kills Palestinian Boy Who Killed American Woman Elisheva Rose Ida Lubin in Israeli Army:

इस्रायलवर हमासच्या हल्ल्याविरूद्ध आपल्या क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या इस्रायली-अमेरिकन महिला सैनिकाला गेल्या सोमवारी एका 16 वर्षांच्या मुलाने भोसकून ठार केले होते.

इस्रायली महिला सैनिकाचे नाव एलिशेवा रोज इडा लुबिन होते. तिचे वय 20 वर्षे होते. ती मूळची जॉर्जिया, अमेरिकेची होती. हा हल्ला झाला तेव्हा लुबिन इतर दोन सैनिकांसह जेरुसलेममध्ये गस्त घालत होती.

६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात एलिशेवा रोज इडा लुबिन गंभीर जखमी झाली होती. नंतर खोल जखमेमुळे तिचा मृत्यू झाला. यावेळी आणखी एक अधिकारी किरकोळ जखमी झाला.

या घटनेवेळी उपस्थित असलेल्या तिसऱ्या सैनिकाने आरोपी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला.

यानंतर, दोन्ही जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे महिला सैनिकाला मृत घोषित करण्यात आले.

मात्र, इस्रायली संरक्षण दलाने निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या छाप्यादरम्यान महिला सैनिकावर हल्ला करणाऱ्या मुलाला शोधून ठार केले. या वेळी इस्रायली सैनिक आणि स्थानिक पॅलेस्टिनी यांच्यात चकमकीही झाल्या.

यावेळी आरोपींनी जवानांवर दगडफेकही सुरू केली. प्रत्युत्तरादाखल लष्कराने आरोपी मुलाला ठार केले. त्यानंतर येथे हिंसाचार आणखीनच वाढला.

दरम्यान, गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंतची आकडेवारी दिली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघर्षातील मृतांची संख्या 10569 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये 4324 मुलांचा समावेश आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या आहे.

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात सुमारे 1400 लोक मारले गेले आणि हमासने 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

SCROLL FOR NEXT