Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

Austria: स्कूलटॉपर बनली आइसक्रीम किलर; सुंदर मुलगी अन् फ्रीजमध्ये मृतदेह

Austria: पदवीचे शिक्षण घेत असताना ती एका मुलाच्या प्रेमात होती.

दैनिक गोमन्तक

Austria: गेल्या काही दिवसांपासून व्यक्तीची हत्या करुन मृत देहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता पून्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. 1978 साली मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या एस्तिबालिज क्रांजाने दोन व्यक्तींना मारुन त्यांच्या शरीराचे तुकडे कॉक्रीटमध्ये मिसळून फ्रीजमध्ये ठेवल्याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, क्रांझाचे वडील प्रसिद्ध लेखक होते. ते कडक शिस्तीचे असल्याने क्रांझावर त्यांचा दबाव असे. वडीलांच्या सल्ल्यानुसार तिने अर्थशास्त्रात शिक्षण घ्यायचे ठरवले. पदवीचे शिक्षण घेत असताना ती एका मुलाच्या प्रेमात होती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एंगेजमेट केली मात्र यानंतर काही दिवसातच मुलाने लग्नाला नकार दिला.

क्रांझाला या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटले आणि तिने त्याला मारण्यासाठी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले. मात्र यातून तो मुलगा वाचला. यातून बाहेर पडण्यासाठी क्रांझा स्पेन सोडून जर्मनीमध्ये राहायला गेली. तिथे तिने आइसक्रीम पार्लरमध्ये काम सुरु केले.

तिथे तिची ओळख होल्ज नावाच्या व्यक्तीबरोबर झाली. त्याच्याशी तिने लग्न केले. होल्जने काही दिवसात त्याचे काम सोडून दिले व तो क्रांझाच्या कमाईवर अवलंबून राहू लागला. यादरम्यान तो क्रांझाला मारझोडही करु लागला.

क्रांझा हे सगळे सहन करत होती कारण स्वत:चे घर, मुले आणि कुटुंब हे क्रांझाचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. तिला बाळ होत नसल्याने क्रांझा नैराश्यात होती. होल्जने तिला मानसिक आणि शारिरिक द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी डिव्होर्स घेतला.

मात्र आइसक्रीम पार्लरच्या मालकीवरुन त्यांच्यामध्ये पून्हा वाद सुरु झाले. अशाच एका भांडणावेळी क्रांझाने रागाच्या भरात होल्जची 3 गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर तिने त्याच्या शरीराचे तुकडे करुन कॉक्रीटमध्ये मिसळून फ्रीजमध्ये ठेवले व हा फ्रीज तिने मजूरांच्या मदतीने आइसक्रीम पार्ललमध्ये ठेवला.

यादरम्यान तिची ओळख आइस्कीम फ्रीजर बनवणाऱ्या नफ्रेड हिंटरबर्गरसोबत ओळख झाली. त्याच्याबरोबर तिने लग्न केले मात्र थोड्याच कालावधीत तिला समजले की त्याचे अनेक महिलांबरोबर संबंध आहेत तो क्रांझाला धोका देत आहे. हे समजल्यानंतर क्रांझाने योजना तयार करुन त्याला मारले आणि होल्जसारखेच त्याच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन दिले. २०१० मध्ये तिची ओळख रोलैंड नावाच्या व्यक्तीबरोबर झाली. त्याच्याबरोबर ती राहूही लागली होती.

  • कसा उघडकीस आला क्रांझाचा गुन्हा?

आइसक्रीम पार्लरच्या शेजारच्या दुकानमालकाला पाइपलाइनचे काम असल्याने तो बेसमेंटकडे गेला तर त्याला कुलुप लावल्याले दिसले.त्याने कुलुप तोडून आत प्रवेश केला तर दोन मृतदेह असलेला फ्रीज दिसला. त्याने लगेच पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर क्रांझाला पोलिसांनी पकडले. तिला अटक केली तेव्हा ती प्रेग्नंट होती.

न्यायालयाने तिला मानसिक आजार असल्याची नोंद करत उम्रकैदची शिक्षा दिली. 2012 ला जेलमध्ये तिला मुलगा झाला, त्याला त्याच्या वडीलांकडे सोपवण्यात आले होते. मुलाच्या जन्मानंतर रौलंडने जेलमध्येच क्रांझाबरोबर लग्न केल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT