Honeytrap Case Dainik Gomantak
ग्लोबल

Honeytrap Case: पाकिस्तानी महिलेला व्हिडिओ कॉल अन्... हनीट्रॅपमध्ये अडकला 'IAF'चा विंग कमांडर; गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपात अटक, चार्जशीट दाखल

IAF Wing Commander Arrested Honeytrap Delhi: सोशल मीडियावरील एका 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात अडकून या अधिकाऱ्याने हवाई दलाच्या गुप्त हालचालींची माहिती लीक केल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

Manish Jadhav

IAF Wing Commander Arrested Honeytrap Delhi: भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडर दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी देशाच्या संरक्षणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती शत्रू देशापर्यंत पोहोचवल्याच्या आरोपाखाली अटक केली. सोशल मीडियावरील एका 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात अडकून या अधिकाऱ्याने हवाई दलाच्या गुप्त हालचालींची माहिती लीक केल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

दिल्ली पोलिसांनी या अधिकाऱ्याविरुद्ध 'ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सध्या हा विंग कमांडर न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एका मोठ्या आंतरराष्ट्रीय हेरगिरी नेटवर्ककडे बोट दाखवणारे असून, ज्याचा मुख्य हेतू भारताची धोरणात्मक लष्करी गुप्त माहिती गोळा करणे हा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विंग कमांडर हवाई दलाच्या एका फील्ड युनिटमध्ये तैनात होता. एका महिला पाकिस्तानी गुप्तहेर ऑपरेटिव्हने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर ती त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर संभाषण करु लागली. या महिलेने भारतीय सैन्याची हालचाल आणि तुकड्यांच्या तैनातीबाबत गुप्त माहिती, फोटो, व्हिडिओ आणि इतर संवेदनशील डेटा मागितला होता. देशप्रेमाचा विसर पडलेल्या या विंग कमांडरने डिजिटल माध्यमांचा वापर करुन हे सर्व गोपनीय दस्तऐवज आणि संवेदनशील डेटा त्या महिलेला पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हवाई दलाच्या इंटेलिजन्स विंगने दिलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी 31 मे रोजी रात्री उशिरा या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सखोल तपास करुन 30 जुलै रोजी न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आले असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

सूत्रांनुसार, या अधिकाऱ्यावर केवळ माहिती लीक करण्याचाच नाही, तर आपल्या एका सहकाऱ्याच्या मोबाईल फोनमध्ये डेटा चोरणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याचाही गंभीर आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारतीय हवाई दलाने अत्यंत कडक भूमिका घेतली असून अशा देशद्रोही कृत्यांसाठी हवाई दलात 'झिरो टॉलरन्स' असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा विंग कमांडर बऱ्याच काळापासून निगराणीखाली होता आणि योग्य वेळी त्याला कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या स्वाधीन करण्यात आले. हवाई दलाच्या अशाच सक्रिय उपाययोजनांमुळे त्याला पकडणे शक्य झाले.

विशेष म्हणजे, भारतात हनीट्रॅपच्या माध्यमातून लष्करी माहिती चोरण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी राजस्थानच्या अलवर येथील मंगत सिंह नावाच्या एका व्यक्तीलाही पाकिस्तानच्या (Pakistan) 'आयएसआय' (ISI) या गुप्तहेर संघटनेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राजस्थान पोलिसांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत राबवलेल्या पाळत मोहिमेदरम्यान मंगत सिंहच्या संशयास्पद हालचाली उघडकीस आल्या होत्या.

त्यालाही ईशा शर्मा नावाच्या एका पाकिस्तानी महिला हँडलरने आपल्या हनीट्रॅपमध्ये अडकवून पैशांचे आमिष दाखवले होते आणि तो गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलर्सच्या सतत संपर्कात होता. संरक्षणाशी संबंधित या लागोपाठच्या घटनांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT