Hyderabad Youth Died In Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादचा तरुण ठार; एजंटने फसवणूक करुन रशियन सैन्यात केलं होतं भरती

Hyderabad Youth Died In Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात हैदराबादमधील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.

Manish Jadhav

Hyderabad Youth Died In Russia Ukraine War:

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात हैदराबादमधील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. नोकरीच्या नावाखाली एजंटने 30 वर्षीय तरुणाची फसवणूक करुन रशियन सैन्यात भरती केल्याचा आरोप आहे.

यातच आता, युक्रेनबरोबर सुरु असलेल्या युद्धात त्याचा मृत्यू झाला. पीडित तरुणाचे कुटुंब हैदराबादमध्ये राहते. त्याला दोन मुले आणि पत्नी आहे. या तरुणाशिवाय पंजाबच्या होशियारपूरमधील सात तरुण रशियाच्या वतीने युक्रेनमध्ये अडकल्याची घटनाही नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी एक व्हिडिओ जारी करुन भारत सरकारकडे मदतीची याचना केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद अफसान असे आहे. हा 30 वर्षीय तरुण मूळचा हैदराबादचा असून तो नोकरीच्या शोधात रशियाला गेला होता, परंतु एजंटने फसवणूक करुन त्याला रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून भरती केले. त्याला रशियातून (Russia) परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधला होता. तथापि, एआयएमआयएमने मॉस्कोमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी अफसानचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

एजंटने पैसे उकळले आणि त्याला रशियन सैन्यात भरती केले

अफसानसह इतर अनेकांची फसवणूक करणाऱ्या एजंटनी कथितपणे दिशाभूल केल्याची माहिती समोर आली आहे. तो रशियाला नोकरीसाठी गेला होता पण त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आले आणि सीमवेर फ्रंटलाइन वर्कर म्हणून लढण्यासाठी पाठवण्यात आले.

दुसरीकडे, अफसानचा मृत्यू रशियामध्ये गुजरातमधील 23 वर्षीय भारतीय तरुणाच्या मृत्यूच्या काही आठवड्यांनंतर झाला आहे. युक्रेनसोबत (Ukraine) सुरु असलेल्या युद्धादरम्यान त्याला रशियन सैन्यात लढण्यासाठी बळजबरीने भरती करण्यात आले होते. सुरतच्या या तरुणाने ऑनलाइन जाहिरातीद्वारे रशियामध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता आणि तो चेन्नईहून मॉस्कोला गेला होता. पण बनावट एजंट्सच्या प्रभावामुळे तो रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून भरती झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT