Viral Video
Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: इंग्लंडमध्ये महाकाय वादळ; उसळल्या डोंगरा एवढ्या लाटा, पाहा व्हिडिओ

गोमंतक ऑनलाईन टीम

तुम्ही अनेक वादळं पाहिली असतील, समुद्रात येणाऱ्या उंच लाटाही तुम्ही पाहिल्या असतील, पण हे दृश्य पाहून तुमचे हृदय हेलावून जाईल. यूकेमध्ये, अटलांटिक वादळ नोआ केप कॉर्नवॉलला 70 मैल प्रतितास वेगाने वारे आणि उंच लाटांसह धडकले आहे.

या वादळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये समुद्रातून येणार्‍या महाकाय लाटा दिसत आहेत.

वादळामुळे दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील किनारी भाग, विशेषतः डेव्हॉन आणि कॉर्नवॉल, सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. दक्षिण पूर्व इंग्लंडसाठी वाऱ्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, हवामान कार्यालयाने वीज कपात आणि प्रवासात व्यत्यय येण्याचा इशारा दिला आहे.

मंगळवारी रात्री रॉचडेल परिसरात ताशी 40 मैल वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक अपघात झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.

डेव्हॉनमधील स्पेन्स कॉम्बे येथे एका महिलेच्या कारवर झाड पडले, यात झाडामुळे कारचे नुकसान झाले व महिला आत अडकली. नंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. तर, हॅम्पशायरमध्ये वादळामुळे खांब कोसळून एक महिला जखमी झाली.

या संपूर्ण आठवड्यात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ताशी 75 मैल वेगाने जोरदार वारे वाहतील असा अंदाज आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रवासात अडथळा येण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. रस्ते, रेल्वे, हवाई आणि नौका या मार्गाने वाहतूक विस्कळीत राहू शकते. असाही इशारा खात्याने दिला आहे.

यामुळे दक्षिण पश्चिम इंग्लंडचा बराचसा भाग व्यापला आहे, उत्तरेला वेल्श किनारपट्टी, तसेच इंग्लंड आणि केंटच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत पसरलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT