Houthi rebels fired three ballistic missiles at US flagged ship in Red Sea:
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे सागरी हल्ल्यात वाढ झाली आहे. दरम्यान, एडनच्या आखातात पुन्हा एकदा जहाजावर हल्ला करण्यात आला. जहाज अमेरिकेचे आहे.
हुथी बंडखोरांनी अमेरिकन जहाजावर तीन अँटी-शिप बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. याआधीही बंडखोरांनी अमेरिकन जहाजांना लक्ष्य केले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हुथींच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला होता.
यूएस सेंट्रल कमांडने ट्विटरवर एक पोस्ट करून हल्ल्याची माहिती दिली. कमांडने ट्विट केले की, हौथींनी बुधवारी दुपारी 2 वाजता मेसेर्क डेट्रॉईट या अमेरिकन ध्वजांकित जहाजावर तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
जहाजावर बंडखोरांनी अचानक हल्ला केल्याचे कमांडने म्हटले आहे. पहिले क्षेपणास्त्र समुद्रात पडले. आम्ही दुसरे आणि तिसरे क्षेपणास्त्रे नष्ट केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका सागरी हल्ल्यांबाबत गंभीर आहे. ब्रिटनसह अमेरिकेने सोमवारीच बंडखोरांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला. वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून अमेरिका आणि ब्रिटनने हुथींचे कंबरडे मोडले आहे. या हल्ल्यांना कॅनडा, नेदरलँड्स, बहारीन आणि ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला आहे.
अलीकडेच व्हाईट हाऊसचे अधिकारी जॉन किर्बी म्हणाले की, जर या गटाने आणखी हल्ले केले तर अमेरिका त्यांचा प्रतिकार करेल. किर्बी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती.
यादरम्यान किर्बी म्हणाले की, आम्हाला माहित आहे की या गटाकडे अजूनही लष्करी शक्ती आहे. आता या शक्तीचा वापर कसा करायचा हे त्याने ठरवायचे आहे. त्यांनी हल्ले सुरूच ठेवले तर आम्हीही हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि त्यांचा योग्य मुकाबला करू.
हुथी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याहमा सारी यांनी सांगितले की, हुथी अमेरिकेच्या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर देतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.