US  Houthi Rebels US
US Houthi Rebels USDainik Gomantak

Red Sea: जहाजांवरील हल्ल्याला अमेरिकेचे चोख प्रत्युत्तर, हुथी बंडखोरांच्या तळांवर डागली क्षेपणास्त्रे

Houthi Rebels: येमेनमधील हुथी बंडखोरांविरुद्ध अमेरिकेची कारवाई सुरूच आहे. बुधवारी रात्री अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा बंडखोरांच्या ठिकाणांवर बॉम्बफेक केली.
Published on

US operation against Houthi rebels in Yemen continues. On Wednesday night, US warplanes once again bombed rebel positions:

येमेनमधील हुथी बंडखोरांविरुद्ध अमेरिकेची कारवाई सुरूच आहे. बुधवारी रात्री अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा बंडखोरांच्या ठिकाणांवर बॉम्बफेक केली.

यापूर्वी, या गटाने अमेरिकेच्या मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केला होता, ज्याला अमेरिकेने प्रत्युत्तर दिले होते.

मंगळवारी व्हाईट हाऊसने म्हटले होते की, जोपर्यंत हे गट सागरी जहाजांवर हल्ला करत आहे, तोपर्यंत अमेरिकेची प्रत्युत्तराची कारवाईही सुरूच राहील.

मध्य पूर्व जलमार्गांवर देखरेख करणार्‍या ब्रिटिश नेव्हीच्या यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने बुधवारी सांगितले की, मीडिया रिपोर्ट्सनुसार, एडनच्या दक्षिणपूर्वेस सुमारे 70 मैल अंतरावर हौथी ड्रोनने यूएस जहाजाला धडक दिली.

हल्ल्यामुळे जहाजाला आग लागल्याची माहिती जहाजाच्या कॅप्टनने दिली. मात्र, ती वेळीच विझवण्यात आली. जहाज आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

US  Houthi Rebels US
600 दहशतवाद्यांचा ग्रुप, कुलभूषण जाधवचे केले होते अपहरण... वाचा- इराणने जैश अल-अदलला का केले लक्ष्य?

त्याच वेळी, हुथी सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याहमा सारी यांनी जहाजाची ओळख जेन्को पिकार्डी अशी केली आहे.

एका जुन्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले होते की, हुथी हे स्पष्ट करतात की अमेरिकेच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. पिकार्डीचे मालक अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रहिवासी आहेत.

US  Houthi Rebels US
Iran Airstrike: इराण-पाकिस्तान संघर्षादरम्यान चीनचे आले वक्तव्य; ''दोन्ही देशांनी...''

एक दिवस अगोदर व्हाईट हाऊसचे अधिकारी जॉन किर्बी म्हणाले होते की, जर अमेरिकेने हल्ले सुरू ठेवले तर ते या गटाचा प्रतिकार करेल.

यादरम्यान किर्बी म्हणाले की आम्हाला माहित आहे की, या गटाकडे अजूनही लष्करी शक्ती आहे. आता या शक्तीचा वापर तो कसा करायचा हे त्याने ठरवायचे आहे. त्यांनी हल्ले सुरूच ठेवले तर आम्हीही हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि त्यांचा योग्य मुकाबला करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com