Houthi Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Houthi Missile Attack: हुथी बंडखोरांनी इस्रायल विमानतळाला बनवले लक्ष्य, पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; व्हिडिओ व्हायरल!

Ben Gurion Airport Strike: हुथी बंडखोर मागे हटण्यास तयार नाहीत. येमेनच्या हुथींनी डागलेल्या क्षेपणास्त्रांनी बेन गुरियन विमानतळावर हल्ला केल्याची पुष्टी इस्रायली सूत्रांनी केली आहे. या हल्ल्याचे अनेक फुटेजही समोर आले आहेत.

Manish Jadhav

एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबत नाही तर दुसरीकडे इस्रायलच्या पाठिंब्याने अमेरिकेने येमेनवर बॉम्ब वर्षाव सुरु केला आहे. दररोज येमेनी शहरांवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही हुथी बंडखोर मागे हटण्यास तयार नाहीत. येमेनच्या हुथींनी डागलेल्या क्षेपणास्त्रांनी बेन गुरियन विमानतळावर हल्ला केल्याची पुष्टी इस्रायली सूत्रांनी केली आहे. या हल्ल्याचे अनेक फुटेजही समोर आले आहेत.

दरम्यान, येमेनच्या (Yemen) दिशेने क्षेपणास्त्र डागल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक फोटोंमध्ये सायरनचा आवाज ऐकून इस्रायली लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत. वृत्तानुसार, विमानतळावरील या हल्ल्यात एक इस्रायली जखमी झाला आहे. हुथी क्षेपणास्त्राबाबत आयडीएफचे म्हणणे आहे की, त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु ते विमानतळ कंपाऊंड रोडला लागून असलेल्या बागेत पडले.

नॅशनल युनिटीचे अध्यक्ष आणि माजी इस्रायली मंत्री बेनी गँट्झ, ज्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या गाझा युद्धाबाबतच्या धोरणाच्या निषेधार्थ सरकारमधून बाहेर पडले होते. या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. "हे येमेन नाहीये, हे इराण आहे. इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागणारा इराणच आहे आणि त्याने जबाबदारी घेतली पाहिजे," असे मंत्री बेनी गँट्झ यांनी ट्विट करुन सांगितले.

हुथी बंडखोर इस्रायलवर हल्ला का करत आहे?

2023 मध्ये इस्रायलने गाझावर हल्ले सुरु केल्यानंतर हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात वेढा घातला आणि गाझाशी एकता दाखवण्यासाठी इस्रायलवर हल्ले केले. इस्रायल गाझामधील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत ते त्यांच्या कारवाया सुरुच ठेवतील असे हुथी बंडखोरांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT