Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Arrest: इम्रान खानच नव्हे पाकिस्तानच्या 'या' पंतप्रधानांनाही यापूर्वी झाली होती अटक

Manish Jadhav

Imran Khan Arrest: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी अटक केली.

इस्लामाबाद उच्च न्यायालयात उपस्थित असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्संनी ताब्यात घेतले. त्यानंतर देशातील राजकीय परिस्थीती वेगाने बदलली. इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले.

कार्यकर्त्यांना पाकिस्तानातील मुख्य शहरांमध्ये या अटकेचा निषेध नोंदवत गोंधळ, जाळपोळ, तोडफोड केली. दरम्यान पाकिस्तानी जनता एकीकडे वाढत्या महागाईचा सामना करत आहे, तर दुसरीकडे देशातील राजकीय अस्थिरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) हे पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान नाहीत, ज्यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी देखील पंतप्रधानपदी राहिलेल्या राजकीय नेत्यांना लष्कराकडून अटक करण्यात आली आहे. चला तर मग त्यांच्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया...

हुसेन शहीद सुहरावर​ (Huseyn Shaheed Suhrawardy)

पाकिस्तानात (Pakistan) पंतप्रधानांना अटक करण्याचा ट्रेंड 1960 च्या दशकात सुरु झाला. जानेवारी 1962 मध्ये देशाचे पाचवे पंतप्रधान असलेले हुसेन शहीद सुहरावर यांना अटक करण्यात आली होती.

त्यांनी जनरल अयुब खान यांच्या सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर, त्यांच्यावर सरकारविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांना कराची येथील मध्यवर्ती कारागृहात एकांतवासात ठेवण्यात आले होते.

झुल्फिकार अली भुट्टो (Zulfikar Ali Bhutto)

झुल्फिकार अली भुट्टो हे ऑगस्ट 1973 ते जुलै 1977 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. सप्टेंबर 1977 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. एका राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एप्रिल 1979 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto)

झुल्फिकार भुट्टो यांची लेक बेनझीर या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बेनझीर डिसेंबर 1998 ते ऑगस्ट 1990 आणि ऑक्टोबर 1993 ते नोव्हेंबर 1996 या कालावधीत दोनदा पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या.

ऑगस्ट 1985 मध्ये त्या त्यांच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानात आल्या आणि त्यांना 90 दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले.

त्यानंतर, ऑगस्ट 1986 मध्ये, स्वातंत्र्यदिनी कराचीतील रॅलीत, बेनझीर यांनी सरकारचा निषेध केला आणि त्यांना अटक करण्यात आली.

नवाझ शरीफ (Nawaz Sharif)

तत्कालीन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी 1999 मध्ये हद्दपार केल्यानंतर नवाझ शरीफ सप्टेंबर 2007 मध्ये पाकिस्तानात परतले. मात्र, परतल्यानंतर त्यांना काही तासांतच अटक करण्यात आली.

येथून 10 वर्षांचा वनवास पूर्ण करण्यासाठी त्यांना सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पाठवण्यात आले. यानंतर, एनएबीने 2010 मध्ये नवाज यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

2018 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि सात वर्षांची शिक्षा झाली. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांना उपचारासाठी पाकिस्तानबाहेर जाण्याची परवानगी मिळाली आणि तेव्हापासून ते लंडनमध्ये आहेत.

शाहिद खाकन अब्बासी (Shahid Khaqan Abbasi)

शाहिद खाकान अब्बासी हे ऑगस्ट 2017 ते मे 2018 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. जुलै 2019 रोजी एनएबी पथकाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती.

अब्जावधी डॉलर्सच्या एलएनजी कंत्राटात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. 27 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना जामीन मिळाल्यानंतर अडियाला तुरुंगातून सुटका करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT