Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Imran Khan: इम्रान खानसाठी आली 'ही' आनंदाची बातमी! काही दिवस घेणार सुटकेचा श्वास

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोर न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोर न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना जाळपोळ, पोलिसांविरुद्ध हिंसाचार, तोडफोड आणि जिला शाह यांच्या हत्येशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

तोशाखाना प्रकरणी इम्रान यांना अटक करण्याच्या मोहिमेदरम्यान इम्रान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झालेल्या हाणामारीच्या संदर्भात लाहोर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले होते.

अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवला

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन प्रकरणांमध्ये इम्रान खान यांचा अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

यापूर्वी 27 मार्च रोजी, न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना फेडरल ज्युडिशियल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या चकमकींबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन मंजूर केला होता.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (IHC) मुख्य न्यायमूर्ती आमेर फारुक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्या खंडपीठाने जामीन अर्जावर सुनावणी केली.

 Imran Khan
Imran Khan यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, अटकेची टांगती तलवार कायम

दहशतवादाशी संबंधित तीन प्रकरणात जामीन मिळाला

याआधी, 25 मार्च रोजी दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दहशतवादाशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये 4 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

लाहोर पोलिसांनी (Police) इम्रान यांच्यावर हे गुन्हे दाखल केले आहेत. इम्रान (70) लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाला.

यावेळी, त्यांचे शेकडो समर्थकही त्यांच्यासोबत होते. इम्रान यांनी न्यायाधीश एजाज अहमद बुट्टर यांना सांगितले की, लाहोरमधील रेसकोर्स पोलिसांनी नोंदवलेल्या तीन दहशतवादी प्रकरणांच्या तपासात मला सहभागी व्हायचे आहे.

त्यानंतर न्यायालयाने इम्रान यांना अटकपूर्व जामीन दिला होता आणि प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com