King Charles III Dainik Gomantak
ग्लोबल

King Charles III: ब्रिटनचा राजा डोक्याला रूमाल बांधून पोहचला गुरुद्वारामध्ये, पुढे काय झाले पाहा

विद्यार्थ्यांनी चार्ल्स यांना पाहताच त्यांचे स्वागत केले. चार्ल्स यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Pramod Yadav

King Charles III Visit Gurudwara: ब्रिटनचे महाराजा चार्ल्स तिसरे (King Charles III) यांनी नुकतेच नवीन गुरु नानक गुरुद्वाराचे उद्घाटन केले. पूर्व इंग्लंडमधील बेडफोर्डशायरला ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी पहिल्यांदाच भेट दिली. यावेळी गुरुद्वारामधील लंगर तयार करण्यासाठी उपस्थित स्थानिक समुदायातील स्वयंसेवकांशी त्यांनी संवाद साधला.

महाराजा चार्ल्स (74) यांनी मंगळवारी गुरुद्वाराच्या स्वयंपाकघरात भेट दिली. लंगर तयार होत असलेल्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. गुरुद्वाराच्या वतीने कोविड काळात केलेल्या कामाचे महाराजा चार्ल्स यांनी कौतुक केले. यावेळी शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी चार्ल्स यांना पाहताच त्यांचे स्वागत केले. चार्ल्स यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महाराज कीर्तन ऐकण्यासाठी गुरुद्वाराच्या दिवाण हॉलमध्ये शीख समाजाच्या नेत्यांसोबत बसल्याले देखील दिसत आहेत. राजेशाही निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवदेनानुसार, "नवीन बांधण्यात आलेल्या गुरू नानक गुरुद्वारामध्ये ल्युटन शीख सूप किचन स्टँड (Luton Sikh Soup Kitchen Stand) चालवणाऱ्या स्वयंसेवकांची महाराजा चार्ल्स यांनी भेट घेतली." गुरुद्वाराच्या माध्यमातून कोरोना साथीच्या काळात कोविड लसीकरण मोहिम चालवली होती. याचे देखील ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT