Pakistan Video: पाकिस्तानमध्ये हिंदू दहशतवाद दाखवणारी वेब सीरिज; भारताविरुद्ध अपप्रचार, पाहा व्हिडिओ

या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे.
Sevak Webseries
Sevak Webseries Dainik Gomantak
Published on
Updated on

धर्माच्या नावाखाली 1947 मध्ये पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. स्वतंत्र देश झाल्यानंतर देखील पाकिस्तानमध्ये हिंदूंबद्दलचा द्वेष कमी झालेला नाही असे दिसते. पाकिस्तानमधील हिंदू आणि शीखांवर वेळोवेळी अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांचे धर्मांतर देखील करण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानने आता जगासमोर हिंदू दहशतवाद दाखवणारी एक प्रोपगंडा वेब सिरीज तयार केली आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे.

Sevak Webseries
Goa Petrol-Diesel Price: पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल; गोव्यातील दर जाणून घ्या

'सेवक- द कन्फेशन' असे या वेब सिरीजचे नाव आहे. या वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये 1984 च्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि अयोध्या वादापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये गौरी लंकेश, दीप सिद्धू, हेमंत करकरे आणि जुनैद खान यांच्या जीवनाचा एक भाग देखील समाविष्ट करण्यात आला आहे. हिंदू संत आणि भाजप नेत्यांच्या विरोधात द्वेष दाखवण्यात आल्याचे या सीरिजमध्ये दिसत आहे. तसेच, हिंदू-मुस्लिम यांच्यात द्वेष वाढवणारे दृश्यही यात दाखवण्यात आली आहेत.

Sevak Webseries
Maharashtra Karnataka Border Dispute: प्रवाशांची होणार गैरसोय, सीमावादानंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या मते, 2011 च्या यूएस सरकारी आयोगाच्या अहवालात, पाकिस्तानी शाळांमधील पाठ्यपुस्तकांत हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल द्वेष शिकवला जातो. तसेच, दुसऱ्या धर्मांना इस्लामचे शत्रू म्हणून दाखवले जाते.

दरम्यान, या वेब सीरिजवरून भारतातून अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. चुकीचा समज आणि माहिती पाकिस्तानकडून प्रसारित केली जात असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com