gopichand hinduja dainik gomantak
ग्लोबल

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Manish Jadhav

Hinduja Became Britains Richest: बिझनेसच्या दुनियेत हिंदुजा ग्रुपने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. खरे तर, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हिंदुजा कुटुंबातील व्यक्ती या पदावर पोहोचण्याची ही सलग सहावी वेळ आहे. गोपीचंद हिंदुजा हे भारतीय वंशाचे आहेत. हिंदुजा ग्रुपच्या अनेक यशोगाथा आहेत. त्याचा इतिहासही अनेक वर्षांचा आहे. आजच्या पाकिस्तानातील एका छोट्या शहरातून सुरु झालेला हिंदुजा ग्रुप आता 48 देशांमध्ये पसरला आहे.

दरम्यान, एकेकाळी ब्रिटीशांचा गुलाम असलेल्या भारताने देदीप्यमान प्रगती केली. आज ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये भारतीयांचा समावेश होतो. संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, हिंदुजा समूहाची एकूण संपत्ती 39 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हिंदुजा समूहाच्या संपत्तीत 2.1`9 अब्ज पौंडांची विक्रमी वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया हिंदुजा ग्रुप आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांच्याबद्दल...

कोण आहेत गोपीचंद हिंदुजा?

गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म 1940 मध्ये अविभाजित भारतात झाला होता. ते हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत. त्यांचे मोठे बंधू श्रीचंद हिंदुजा यांचे 2023 मध्ये निधन झाले. त्यानंतर गोपीचंद हिंदुजा यांना हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष बनवण्यात आले. 1959 मध्ये मुंबईच्या जैन हिंद कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. हिंदुजा ग्रुपची स्थापना वडील परमानंद हिंदुजा यांनी 1914 मध्ये केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर गोपीचंद आणि त्यांच्या बंधूंनी ग्रुपची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.

अशी झाली सुरुवात

मर्चंट बँकिंग आणि व्यापारापासून सुरु झालेल्या हिंदुजा ग्रुपची स्थापना सिंधमधील शिकारपूर शहरात झाली. त्याची स्थापना 1914 मध्ये परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती. कंपनीने इराणमध्ये 1919 मध्ये पहिले कार्यालय उघडले. त्याचे मुख्यालय 60 वर्षे इराणमध्ये होते. 1979 मध्ये इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर हिंदुजा समूहाने आपले मुख्यालय ब्रिटनची राजधानी लंडन येथे हलवले. परमानंद दीपचंद यांना चार पुत्र आहेत. 1971 मध्ये परमानंद दीपचंद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी हिंदुजा ग्रुपचा जगभर विस्तार केला.

या क्षेत्रांमध्ये हिंदुजा ग्रुप

अशोक लेलँडचे नाव तुम्ही ऐकले असेलच. ही कंपनी हिंदुजा ग्रुपची आहे. हिंदुजा ग्रुपने 48 देशांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. याशिवाय, दीड लाखांहून अधिक लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. भारतातही हिंदुजा ग्रुपच्या काही कंपन्या आहेत, ज्यामध्ये अशोक लेलँड, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन, हिंदुजा फायनान्स, पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. यासोबतच, हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय ऑटो, आयटी, पॉवर जनरेशन, रिअल इस्टेट, मीडिया आणि एंटरटेनमेंट, ऑइल आणि स्पेशालिटी केमिकल्स, बँकिंग आणि फायनान्स, हेल्थकेअर अशा अनेक क्षेत्रात पसरलेला आहे.

चार पुत्रांची भूमिका काय?

श्रीचंद पी हिंदुजा हे निधन झालेले सर्वात मोठे भाऊ होते. तर गोपीचंद हिंदुजा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रकाश पी हिंदुजा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वात धाकट्या भावाचे नाव अशोक पी हिंदुजा आहे. चारही भावांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. श्रीचंद पी हिंदुजा यांच्या निधनानंतर गोपीचंद हिंदुजा संपूर्ण समूहाचे अध्यक्ष आहेत. युरोपमध्ये प्रकाश हे हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आहेत, तर भारतात अशोक हे हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आहेत. संपूर्ण हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हे लंडनमध्ये राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT