Britain Economy: ऋषी सुनक झाले फेल? ब्रिटनमध्ये महागाई दर 10 टक्क्यांच्या पार, परिस्थिती गंभीर

Britain PM Rishi Sunak: ब्रिटनने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना मोठ्या आशेने पंतप्रधानपदावर बसवले होते.
Britain PM Rishi Sunak
Britain PM Rishi SunakDainik Gomantak
Published on
Updated on

Britain Economy: ब्रिटनने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना मोठ्या आशेने पंतप्रधानपदावर बसवले. मात्र सत्तांतर होऊन अनेक महिने लोटले तरी सुनक यांच्या प्रयत्नांना फळ येताना दिसत नाहीये. ब्रिटनमध्ये महागाई अनियंत्रित झाली आहे.

ताज्या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये चार महिन्यांत पहिल्यांदाच फेब्रुवारीत महागाईचा दर वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे विश्लेषकही आश्चर्यचकित झाले आहेत.

सततच्या क्षीण होत चाललेल्या स्थितीत मध्यवर्ती बँकेच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत व्याजदरात वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे.

नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने बुधवारी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये ग्राहक (Customer) किंमत निर्देशांक मागील महिन्यातील 10.1 टक्क्यांवरुन 10.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.

चलनवाढ बँक ऑफ इंग्लंडच्या 2 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा पाचपट जास्त आहे. तथापि, अर्थतज्ज्ञांना वर्षाच्या अखेरीस किंमतींमध्ये तीव्र घट अपेक्षित आहे.

बँकेने डिसेंबर 2021 पासून सलग दहा वेळा दर वाढवले ​​आहेत, जे आता चार टक्क्यांवर पोहोचले आहेत. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडवर व्याजदर वाढवण्याचा दबावही वाढला आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत बँक या संदर्भात निर्णय घेऊ शकते.

Britain PM Rishi Sunak
Rishi Sunak भडकले, PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरुन ब्रिटिश संसदेत गदारोळ

सुपर मार्केट खाली झाले

गेल्या महिन्यात ब्रिटनमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. युक्रेन युद्ध आणि ब्रेक्झिटमुळे ब्रिटनची (Britain) अर्थव्यवस्था पुरती कोलमडली.

ब्रिटनची आवक झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सुपर स्टोअरमध्ये फळे आणि भाज्यांचे रिकामे काउंटर पाहायला मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com