Bangladesh 
ग्लोबल

Bangladesh: प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्याला बांगलादेशात अटक

Blasphemy Case In Bangladesh: २३ वर्षीय विकास धर बांगलादेशमधील शाहजलाल विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

बांगलादेश: प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली हिंदू विद्यार्थ्याला बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली आहे. सिल्हेट भागातील मौलवीबाजार सदर उपजिल्हा येथे ही घटना घडली. विकास धर दीप्ता असे अटक करण्यात आलेल्या हिंदू विद्यार्थ्याचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय विकास धर बांगलादेशमधील शाहजलाल विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विकासने ११ मे रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात फेसबुकवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर मुस्लिम सुदायाने याप्रकरणी आक्षेप नोंदवत कारवाईची मागणी केली होती.

विकासच्या या पोस्टमुळे सिल्हेट भागातील मौलवीबाजार सदर उपजिल्हा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सायबर सुरक्षा कायद्याअंतर्गत विकासला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अब्दुल कादिर रतन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

बांगलादेश हायकोर्टाने इशनिंदा करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. यात जन्मठेप तसेच मृत्यूदंडाची शिक्षेचा देखील समावेश आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल कादिर रतन यांच्या तक्रारीच्या आधारे विकास धर याला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, विकासवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT