Hindu Temple in Bahrain: भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अर्थातच यूएई आणि इतर आखाती देशांनी भारताकडे आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर देशासह जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता हळूहळू परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. आखाती देशातील हिंदूंसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, UAE नंतर लवकरच इथे दुसऱ्या मुस्लिम देशात हिंदू मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला तर मग जाणून घेऊया...(hindu mandir will be built in bahrain after uae)
शिष्टमंडळाने बहरीनच्या क्राउन प्रिन्सची भेट घेतली
वृत्तानुसार, बहरीनचे (Bahrain) क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान सलमान बिन हमाद अल खलिफा यांनी बुधवारी राजधानी मनामामध्ये स्वामी ब्रह्मविहारीदास आणि BAPS स्वामीनारायण संस्थेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बहरीनमध्ये BAPS स्वामीनारायण हिंदू मंदिराच्या बांधकामाबाबत चर्चा केली. हे मंदिर 1 फेब्रुवारी रोजी बहरीनने दिलेल्या जमिनीवर हे मंदीर बांधले जाणार आहे. या बैठकीला भारताचे (India) राजदूत पियुष श्रीवास्तवही उपस्थित होते. या बैठकीचे नेतृत्व स्वामी ब्रह्मविहारीदास, आंतरराष्ट्रीय समन्वयक आणि BAPS मध्य पूर्वचे प्रमुख होते. शिष्टमंडळात स्वामी अक्षित दास आणि BAPS बहरीनचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल वैद्य यांचाही समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
या भेटीदरम्यान ब्रह्म विहारीदास यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही युवराजांना दिला, ज्यामध्ये मोदींनी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले आहे. त्यांनी BAPS चे जागतिक अध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छाही युवराजांना दिल्या.
या मंदिरात सर्व धर्माच्या लोकांचे स्वागत होईल
यावेळी स्वामी ब्रह्मविहारीदास म्हणाले की, बहरीनमध्ये बांधण्यात येणारे हे मंदिर भारतीय परंपरा जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी असणार आहे. हे मंदिर साकारल्याबद्दल त्यांनी बहरीनचे क्राउन प्रिन्स आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचेही आभार मानले. ते पुढे म्हणाले की, 'दोन्ही देशांतील संबंध आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी हा अतिशय खास आणि विशेष क्षण आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.