Pakistan Video Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Video: पाकिस्तानमध्ये हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या, ‘टार्गेट किलिंग’चा संशय

पोलिसांनी डॉ. जेनानी यांच्या हत्येला ‘टार्गेट किलिंग’ म्हटले आहे. दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पाकिस्तानमध्ये हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डॉ. बिरबल जेनानी असे या डॉक्टरांचे नाव आहे. गेनानी टार्गेट किलिंगचा बळी ठरले आहेत. गुरुवारी आपल्या दवाखान्यातून घरी परतत असताना कराचीच्या लियारीजवळ त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन (KMC) चे माजी आरोग्य आणि नेत्रतज्ज्ञ म्हणून डॉ. बिरबल जेनानी कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बिरबल जेनानी आणि त्यांची महिला सहाय्यक डॉ. रामास्वामी ते गुलशन-ए-इकबाल एकत्र प्रवास करत होते. लियारी एक्स्प्रेस वेवरील गार्डन इंटरचेंजजवळ अज्ञातांनी त्याच्या कारला लक्ष्य केले व गोळीबार केला. यात डॉ. जेनानी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सहाय्यक महिला डॉक्टर गोळी लागल्याने जखमी झाल्या.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, डॉ. जेनानी यांची कार भिंतीवर आदळताना दिसत आहे.

पोलिसांनी डॉ. जेनानी यांच्या हत्येला ‘टार्गेट किलिंग’ म्हटले आहे. दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जेनानी यांच्यासोबत काम करणारी महिला डॉक्टरही हल्ल्याच्या वेळी गाडीत होती. "अचानक गोळीबार सुरू झाला आणि मला काहीच समजले नाही." अशी माहिती जखमी महिलेने पोलिसांना दिली आहे.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सिंधचे राज्यपाल कामरान खान टेसोरी यांनी कराची पोलिसांच्या अतिरिक्त महानिरीक्षकांकडून घटनेचा अहवाल मागवला आहे. डॉक्टरच्या हत्येबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. पाकिस्तानस्थित द एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने गेल्या आठवड्यात रमझान अध्यादेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये हिंदू दुकानदारांवर हल्ले करण्यात आल्याचे वृत्त दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT