Ram Navami: उत्साह आणि जय श्रीरामचा जयघोष, मुरगावात भक्तिमय वातावरणात रामनवमी साजरी

मुरगाव तालुक्यातील मंदिरांतून याप्रसंगी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Ram Navami 2023
Ram Navami 2023 Dainik Gomantak

Ram Navami 2023: मुरगाव तालुक्यात रामनवमी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मुरगाव तालुक्यातील मंदिरांतून याप्रसंगी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदु परिषदेने मुरगाव तालुक्यातील मंदिर व्यवस्थापन, रामभक्त व इतरांच्या सहकार्याने राम रथयात्रेचे आयोजन केले होते.

सांकवाळ येथून सुरू झालेली ही रथयात्रा सडा भागात पोहचल्यावर सांगता झाली. गतवर्षी रामनवमीच्या दिवशी बायणा येथे एक अनुचित प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा पोलिसांनी खास खबरदारी घेतली होती.

सांकवाळ येथून सुरू झालेल्या रथयात्रेत महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. एमईएस चौक, दाबोळी विमानतळ चौक येथून शांतीनगर मार्गाने यात्रा नवेवाडे येथे गेली. तेथे निरनिराळ्या मंदिरांसमोर यात्रा आल्यावर तिचे स्वागत करण्यात आले.

तेथून यात्रा गोवा शिपयार्ड येथील ओवळेश्वर, शहर भागातील दामोदर मंदिर येथून बायणा भागातील ब्रह्मस्थळ मंदिर व इतर मंदिरे, मांगोरच्या हनुमान मंदिरासमोर यात्रा आली. यानंतर वरुणपुरी मार्गाने यात्रा राष्ट्रीय महामार्गाने सहा भागात गेली. यात्रेदरम्यान पोलिस बंदोबस्त होता. त्याप्रमाणे सुनियोजन केल्याने यात्रा वेळेवर पोचत होती.

Ram Navami 2023
Delhi: डासांपासून वाचण्यासाठी मॉर्टिन लावले अन् जीवाला मुकले; 6 जणांचा मृत्यू

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले की, गोवा आणि भारतात 'रामराज्य' हे लोक- सर्वसमावेशक प्रशासन आधीच स्थापित झाले आहे.

रामनवमीनिमित्त मुरगाव तालुक्यात विश्व हिन्दू परिषदेतर्फे काढण्यात आलेल्या राम रथ शोभा यात्रेचे स्वागत केल्यानंतर साळकर बोलत होते.

आपल्याकडे 'रामराज्य' म्हणजे सर्व लोकांचा सक्रिय सहभाग असलेले प्रशासन असले पाहिजे. आम्ही पाहतो की रामराज्याची ही कल्पना गोवा आणि भारतात आधीच प्रस्थापित झाली आहे आणि आम्ही सर्व लोकांना आवाहन करतो. प्रभू रामाच्या जीवनातून नीतिमान आणि सदाचारी जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली,” साळकर म्हणाले.

"गेल्या वर्षी रामनवमीच्या वेळी किरकोळ जातीय संघर्ष झाला होता. अशा सर्व घटना लक्षात घेऊन आम्ही पूर्ण बंदोबस्त तैनात केला संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी बंदोबस्त आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आमच्या पोलिसांची वाहनेही राम रथ शोभा यात्रेसोबत फिरली." असे वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com