Israel Terror Attack
Israel Terror Attack Twitter
ग्लोबल

रमजानपूर्वी हिंसाचाराची भीती, इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट

दैनिक गोमन्तक

इस्रायलमधील तेल अवीवमध्ये पॅलेस्टिनी बंदुकधारी हल्लेखोराने पाच जणांना ठार केल्यानंतर इस्रायली सुरक्षा दल आणि एजन्सी हाय अलर्टवर (Israel Terror Attack) आहेत. वृत्तानुसार, मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यांतील हा पाचवा हल्ला आहे. या सर्व हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 11 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अहवालानुसार एका वर्षांत इतक्या कमी वेळात 11 सामान्य इस्रायली लोकं मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायली लष्कराने वेस्ट बँकमध्ये तैनाती वाढवल्याचे सांगितले आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांनी मे महिन्यात सांगितले की 2021 मधील गाझा युद्धानंतर इस्रायली सुरक्षा दल त्यांच्या सर्वोच्च पातळीवर सतर्क आहेत. इस्रायली अधिकार्‍यांनी एप्रिलमध्ये मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात हल्ल्यांमध्ये वाढ होण्याचा इशारा दिला होता, रमजानच्या (Ramdan 2022) या काळात या आधीही हिंसाचार वाढला आहे.

इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्याने रस्त्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 5 लोकं ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि हिंसाचाराचा निषेध केला. इस्रायलला घातक अरब दहशतवादाच्या लाटेचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 'ते पुढे म्हणाले की, आमचे सुरक्षा दल काम करत आहेत. आम्ही चिकाटीने, परिश्रमाने दहशतवादाचा मुकाबला करू. ते आम्हाला येथून हलवू शकत नाहीत. आम्ही अधिक मजबूत होऊ.'

पॅलेस्टिनी काय म्हणाले?

पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या गोळीबाराचा निषेध केला. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांच्या हत्येमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल, विशेषत: रमजानचा पवित्र महिना आणि ख्रिश्चन, ज्यूंच्या सुट्ट्या जवळ येत असताना. अशा प्रकारच्या घटना घडणे चांगले नाही.

त्याचबरोबर इस्लामिक संघटना हमासने या हल्ल्याचे कौतुक केले आहे. हमासने या हल्ल्याचे वर्णन शौर्यपूर्ण ऑपरेशन म्हणून केले आहे परंतु हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मोशिर अल-मसरी या हमासच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हा हल्ला दक्षिण इस्रायलमधील नेगेव येथे झालेल्या शिखर परिषदेची प्रतिक्रिया आहे, ज्यामध्ये चार अरब परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच राजनैतिक बैठकीसाठी इस्रायलमध्ये आले होते. या कारवाईमुळे अनेक पॅलेस्टिनी संतप्त झाले आहेत. अरब देशांच्या या हालचालीकडे लोकांनी विश्वासघात म्हणून पाहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT