"हो, तुम्ही पंतप्रधान नसताना पाकिस्तान महान होता"

पाकिस्तानमधील (Pakistan) राजकीय संकट अधिक गडद होत चाललं आहे.
Reham Khan & Imran Khan
Reham Khan & Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमधील राजकीय संकट अधिक गडद होत चाललं आहे. मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) आणि बलुचिस्तान अवामी पार्टी (BAP) विरोधी आघाडीत सामील झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत गमावले आहे. याच पाश्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची पत्नी रेहम खानने (Reham Khan) आज आपल्याच पतीवर जोरदार निशाणा साधला. देशातील जनतेने एकत्र येत इम्रानने केलेली घाण साफ करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रेहमने म्हटले आहे.

दरम्यान, 2018 मध्ये 'नया पाकिस्तान' निर्माण करण्याचे आश्वासन देऊन इम्रान सत्तेवर आले, परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींसारख्या मूलभूत समस्येचे निराकरण करण्यात ते अपयशी ठरले, ज्यामुळे विरोधकांना त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली, असंही रहमने म्हटले आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावर केलेल्या ट्विटमध्ये रेहमने म्हटलयं की, 'इम्रान इतिहास!! मला वाटते की, आपण सर्वांनी एकत्र येऊन नया पाकिस्तानने (Pakistan) मागे टाकलेला गोंधळ दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'

Reham Khan & Imran Khan
'...मी कुणासमोर झुकणार नाही: पंतप्रधान इम्रान खान

रेहम पुढे म्हणाल्या, 'इम्रान खान यांच्याकडे बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता नाही.' पाकिस्तानचे पंतप्रधान देशाला संबोधित करताना म्हणाले की, देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे, मला कशाचीही गरज नाही कारण मी आयुष्यात सर्वकाही मिळवले आहे. संपत्ती इत्यादीशी रेहमनने इम्रान यांच्याशी सहमती दर्शवली. रेहमन पुढे म्हणाल्या, तो लहान असताना पाकिस्तानची जगात वेगळी होती. इम्रान खान यांच्या भाषणावर टीका करताना रेहमनेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हो, तुम्ही पंतप्रधान नसताना पाकिस्तान महान होता.'

Reham Khan & Imran Khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार?

विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना इम्रान खान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. इम्रान खान म्हणाले, मी शेवटच्या क्षणापर्यंत लढेन. विरोधक मला राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. मी 20 वर्षे क्रिकेट खेळलो आहे, आणि विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत मी स्पर्धा केली आहे. मी आयुष्यात कधीही हार मानली नाही. मतदानानंतर (Vote on no-confidence motion) माझ्या क्षमता आणखी मजबूत होतील. मतदानाचा निकाल काहीही लागला तरी, मी पाकिस्तानी जनतेसाठी काम करत राहणार आहे.

Reham Khan & Imran Khan
पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, पक्षाचे 50 मंत्री झाले 'बेपत्ता'

दरम्यान, भूतकाळातील पाकिस्तानच्या सोनेरी क्षणांचा उल्लेख करत इम्रान म्हणाले, ''मी लहान असताना मला आठवते की, जगात पाकिस्तानची वेगळी ओळख निर्माण झाली होती. आमच्या प्रगतीचा लेखाजोखा घेण्यासाठी दक्षिण कोरिया (South Korea) पाकिस्तानात आला, मलेशियाचे राजकुमार माझ्यासोबत शाळेत होते. आपल्या विद्यापीठांमध्ये मध्यपूर्वेतील देश यायचे. परंतु पाकिस्तानचं हे वैभव संपतानाही मी पाहिले आहे, माझ्या देशाचा अपमान होताना पाहिला आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com