पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे २८ जणांचा मृत्यू झाला असून १४० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली, झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले.
अधिका-यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे खैबर पख्तुनख्वामधील बन्नू, लक्की मारवत, डेरा इस्माईल खान आणि करक जिल्ह्यात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंजाबमधील खुसाब जिल्ह्यातील एका गावात घराची भिंत कोसळून तीन मुलींचा चिरडून मृत्यू झाला. मदत अधिकारी खतीर अहमद यांनी सांगितले की, जखमींना तात्काळ मदत दिली जात आहे.
गेल्या वर्षी देखील, पाकिस्तानमध्ये मान्सूनच्या पावसानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता आणि 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि तीन कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले होते. लाखो लोकांनाही विस्थापित व्हावे लागले.
अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ येण्यापूर्वी आपत्कालीन उपाययोजना करण्याचे आदेश पंतप्रधान शाहबाज यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले की, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. हे वादळ १५ जूनपर्यंत पाकिस्तानात पोहोचण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.