हिंदू मुलीचं जबरदस्तीनं धर्मांतरण, कोर्टातही मिळाला नाही न्याय; अल्पवयीन मुलीची ह्रदयद्रावक कहाणी

Hindu teen kidnapped in Pakistan: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Court
Court Dainik Gomantak
Published on
Updated on

Hindu teen kidnapped in Pakistan: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर करुन मुस्लिम व्यक्तीशी लग्न लावण्यात आले. तिच्या विनंतीनंतरही न्यायालयाने तिला तिच्या पालकांकडे पाठवण्यास नकार दिला.

दरम्यान, 2 जून रोजी, सोहना शर्मा कुमारीचे सिंध प्रांतातील बेनझीराबाद जिल्ह्यातून तिच्या आईसमोरुन बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. तिचे वडील दिलीप कुमार यांनी पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये सोहनाने स्पष्टपणे सांगितले की, तिने दबावाखाली मुस्लिम धर्म स्वीकारला. विशेष म्हणजे, तिचे मुस्लिम (Muslim) व्यक्तीशी लग्न लावण्यात आले.

Court
Pakistan Economic Crisis: गाढवांच्या भरोसे पाकिस्तानची अर्थव्यवस्था! वर्षभरात एवढ्या प्रमाणात वाढली संख्या; शाहबाज सरकार...

दुसरीकडे, सोशल मीडियावर (Social Media) जनक्षोभ उसळल्यानंतर घटनेच्या पाच दिवसांनंतर पोलिसांनी सोहनाला जिल्ह्यातील एका घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला शुक्रवारी लारकाना येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

तिचे अपहरण करुन मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे सोहनाने न्यायालयाला सांगितले. आता तिला तिच्या कुटुंबीयाकडे परतायचे आहे.

मात्र, सोहना दबावाखाली जबाब देत असल्याचे सांगत न्यायाधीशांनी सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब केली. न्यायालयाने तिची रवानगी महिला विश्रामगृहात केली.

दुसरीकडे, सोहनाची आई जमना शर्मा यांनी न्यायालयाबाहेर मीडियाशी बोलताना सांगितले की, माझी मुलगी घरी ट्युशन घेत होती. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने तिला सांगितले होते की, त्याला 100,000 रुपयांचे कर्ज हवे आहे.

Court
Pakistan Economic Crisis: जीडीपी वाढीच्या 100 पट महागाई, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठं भगदाड; दिवाळखोरीपासून फक्त...!

शिवाय, सिंधच्या अंतर्गत भागातील हिंदू कुटुंबांसाठी किशोरवयीन मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करणे ही एक मोठी समस्या बनली आहे. अलीकडेच, सिंधच्या अंतर्गत भागांमध्ये अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com