Heavy Rainfall in Brazil Dainik Gomantak
ग्लोबल

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Brazil Heavy Rain: आठवड्यात ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य रियो ग्रांडे डो सुल येथे झालेल्या मुसळधार पावसाने दहा जणांचा मृत्यू झाला असून 21 जण बेपत्ता आहेत.

Manish Jadhav

Brazil Heavy Rain: दक्षिण ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या आठवड्यात ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य रियो ग्रांडे डो सुल येथे झालेल्या मुसळधार पावसाने दहा जणांचा मृत्यू झाला असून 21 जण बेपत्ता आहेत. परिस्थिती गंभीर असून काही दिवसांत ती आणखी बिघडू शकते, असा इशारा स्थानिक प्रशासनाकडून दिला आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे 3,300 हून अधिक लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. बुधवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान राज्याचे राज्यपाल एडुआर्डो लेइट यांनी सांगितले की, त्यांनी अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा या आपत्तीसंबंधी अवगत केले आहे. शक्य ती सर्व मदत करण्यात येईल असे अध्यक्षांनी सांगितले आहे. अध्यक्ष लुला गुरुवारी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

राज्यपालांच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे अलिकडच्या वर्षांत राज्यात सर्वात जास्त विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पूल कोसळून रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत.

दरम्यान, पूरामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी ब्राझीलच्या हवाई दलाची बचावकार्यात मदत घेतली जात आहे. परिस्थिती लक्षात घेऊन दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. दक्षिणेकडील राज्याच्या (रियो ग्रांडे डो सुल) मंत्रिमंडळाची 1 मे रोजी बैठक झाली.

एका निवेदनात लेफ्टनंट गव्हर्नर गॅब्रिएल सौझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक फटका बसलेल्या भागातील लोकांना वाचवणे हे प्राधान्य आहे. बचाव मोहिमेअंतर्गत 130 हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सौझा यांनी पुढे सांगितले की, संततधार पावसामुळे (Rain) पुराचा धोका असलेल्या राज्यातील धरणांबाबत विशेष काळजी आहे. धरण असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवले जात आहे.

दुसरीकडे, ब्राझीलच्या (Brazil) राष्ट्रीय हवामान संस्थेने 30 एप्रिल रोजी सांगितले होते की, शहरांमध्ये 24 तासांत 150 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. एल निनोमुळे संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील हवामान प्रभावित झाले आहे. ब्राझीलमध्ये, एल निनोमुळे उत्तरेतील राज्यांना गंभीर अशा दुष्काळाचा तर दक्षिणेतील राज्यांना मुसळधार पावसाचा फटका बसत आहे.

दरम्यान, ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यालाही यावर्षी अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागला. या आपत्तीत 40 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी रेसिफे शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात 100 जणांना जीव गमवावा लागला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलजवळील ॲमेझॉनच्या जंगलांतील वृक्ष तोडीचा परिणाम हवामानावर झाला आहे आणि वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती याचाच परिणाम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT