Brazil Hotel Fire: ब्राझीलमधील 3 मजली हॉटेलला भीषण आग; 10 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी

Brazil Hotel Fire: दक्षिण ब्राझीलच्या पोर्टो अलेग्रे शहरातील एका छोट्या हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली.
Brazil Hotel Fire
Brazil Hotel FireDainik Gomantak

Brazil Hotel Fire: दक्षिण ब्राझीलच्या पोर्टो अलेग्रे (Porto Alegre) शहरातील एका तीन मजली हॉटेलला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. 'गारोआ फ्लोरेस्टा' (Garoa Floresta) नावाच्या हॉटेलच्या तीन मजली इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली, ज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉटेलने किफायतशीर वास्तव्याची व्यवस्था केली होती, ज्यामध्ये बेघरांना आश्रय देण्यासाठी पालिकेशी करार केला होता. रिओ ग्रांदे डो सुल राज्याच्या अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, हॉटेलकडे आवश्यक परवाना नव्हता. त्याचबरोबर आपत्कालीन अग्निशमन दलाची व्यवस्थाही नव्हती.

दरम्यान, या आगीतून बचावलेल्या 56 वर्षीय मार्सेलो वॅगनर शेलेक यांनी दैनिक 'झिरो होरा' या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, ते वेळेत हॉटेलमधून बाहेर पडले, पण तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेली त्यांची बहीण आगीत मरण पावली. ‘गारोआ फ्लोरेस्टा’ हे हॉटेल गॅरोआ ग्रुपचे आहे. ज्याची पोर्टो अलेग्रेमध्ये हे हॉटेल सोडून इतर 22 छोटी हॉटेल्स आहेत. त्यांच्या आणखी एका हॉटेलला 2022 मध्ये अशीच आग लागली होती, ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले होते.

Brazil Hotel Fire
Brazil: अट्टल गुन्हेगार पोलिस चकमकीत ठार, दोन वर्षांनी कबरीतून अचानक गायब झाला मृतदेह

हॉटेलमध्ये 400 रुम होत्या

पोर्टो अलेग्रेचे महापौर सेबॅस्टिओ मेलो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या प्रशासनाने 2020 मध्ये कंपनीसोबत 400 रुम बेघर लोकांना आश्रय देण्यासाठी वापरण्याचा करार केला होता. मेलो म्हणाले की, आता कराराचे पुनरावलोकन केले जाईल आणि हॉटेलच्या 22 युनिट्सची तपासणी केली जाईल. पोर्टो अलेग्रे सिटी हॉलजवळ शुक्रवारी ज्या हॉटेलला आग लागली, त्या हॉटेलमध्ये 16 रुमचे कंत्राट होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीतून सुटका करण्यात आलेल्या 11 पैकी आठ जणांना अजूनही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com