Pakistan Heavy Rain Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Heavy Rain: बुडत्याचा पाय खोलात! पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे 39 जणांचा मृत्यू; बलुचिस्तानमध्ये आणीबाणी लागू

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत.

Manish Jadhav

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. एवढेच नाही तर परिस्थिती इतकी भीषण आहे की, सरकारने बलुचिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या पावसामुळे देशातील विविध भागात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या खैबर पख्तूनख्वामध्ये रविवारी 12 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, पंजाबमध्ये 4 आणि बलुचिस्तानमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानच्या मकरानमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी वीज पडली. या घटनांमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बलुचिस्तानमधील मृतांची संख्या 10 झाली आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बलुचिस्तान सरकारने आणीबाणी घोषित केली आहे. मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक बोलावली आहे. या पावसामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी बैठकीनंतर सांगितले की, आम्ही बचाव पथकांना तातडीने लोकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, अफगाणिस्तानातही अतिवृष्टीमुळे 33 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. तालिबान शासित अफगाणिस्तानात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरेही कोसळली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सुमारे 600 हून घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर 200 जनावरेही ठार झाली आहेत. या पुरामुळे शेतीयोग्य जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यांचेही नुकसान झाले आहे.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती म्हणाले की, पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच तुंबले. पाकिस्तान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते युनूस मेंगल यांनी सांगितले की, बचावकार्य रात्रभर सुरु होते. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद हमीद रिंद यांनी सांगितले की क्वेटाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सोमवार आणि मंगळवारी सर्व शाळा आणि इतर संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT