Congo Heavy Rain And Landslide Dainik Gomantak
ग्लोबल

Congo Heavy Rain And Landslide: काँगोमध्ये मुसळधार पावसाने केला कहर; भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू, 60 लोक बेपत्ता

Congo Heavy Rain: दक्षिण-पश्चिम काँगोमध्ये मुसळधार पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 60 लोक बेपत्ता आहेत.

Manish Jadhav

Congo Heavy Rain And Landslide: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसानंतर आलेल्या पुरात 33 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. यातच, कांगोमध्येही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दक्षिण-पश्चिम काँगोमध्ये मुसळधार पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 60 लोक बेपत्ता आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. इडिओफा शहराजवळील बंदरापासून फार दूर अंतरावर भूस्खलनानंतर सात लोक जिवंत सापडले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक अधिकारी धेधे मुपसा यांनी सांगितले की, पावसामुळे भूस्खलन झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे

प्रांताचे गव्हर्नर फ्लेझिन किवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलेल्या पथकाला सात जण जिवंत सापडले आणि त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल केले. ते म्हणाले की, अजूनही 60 लोक बेपत्ता आहेत. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, बेपत्ता लोकांची नेमकी संख्या सांगणे कठीण आहे कारण या ठिकाणी दर शनिवारी बाजार भरतो. अधिकाऱ्याने सांगितले की, हा भाग एक प्रकारचे बंदर आहे, जिथे मच्छीमार मासे विकण्यासाठी येतात.

याआधीही काँगोमध्ये (Congo) मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झाल्याने मोठी जीवीतहानी झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काँगोमध्ये मुसळधार पावसाने कहर केला होता. येथील बुकावू शहरात मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबरच्या सुरुवातीला, वायव्य काँगोमध्ये मुसळधार पावसामुळे सप्टेंबरमध्ये भूस्खलन झाले, ज्यात 17 लोक ठार झाले.

हवामान खराब होत आहे

अफगाणिस्तानातील नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये पूर्व अफगाणिस्तानात प्रचंड हिमवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर मार्चमधील तीन आठवड्यांच्या पावसात सुमारे 60 जणांचा मृत्यू झाला होता. संयुक्त राष्ट्राने गेल्या वर्षी असा इशारा दिला होता की, अफगाणिस्तानमध्ये हवामानात मोठे बदल होत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानाचे स्वरुप बिघडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT