Covid-19 Dainik Gomantak
ग्लोबल

Covid 19: कोरोना बनला सायलंट किलर? दोन वर्षांत 50 वेळा बदलले रुप; अखेर जीव घेतला

Covid 19: जगभरातील कोरोनाची भीती कदाचित संपली असेल, परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्याचा प्रभाव अजूनही लोकांवर दिसत आहे.

Manish Jadhav

Covid 19: जगभरातील कोरोनाची भीती कदाचित संपली असेल, परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्याचा प्रभाव अजूनही लोकांवर दिसत आहे. कोरोनामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम झाला आहे. यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डच व्यक्तीला गेल्या 613 दिवसांत किमान 50 वेळा कोरोनाची लागण झाली. शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागला. ॲमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. 2023 मध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

दरम्यान, 72 वर्षीय डच व्यक्तीला आधीच रक्ताशी संबंधित आजार होता. यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा कोरोना झाला. संशोधनात असे समोर आले आहे की, कोरोनाने त्याच्या शरीरात 50 वेळा रुप बदलले. टाइमच्या अहवालानुसार, अखेरीस कोरोनाने अल्ट्रा म्युटेड फॉर्म घेतला. यापूर्वी एक ब्रिटिश व्यक्ती 505 दिवस कोरोनाग्रस्त राहिला.

कोरोनाची लागण होण्यापूर्वी पीडित व्यक्तीने लसीचे डोसही घेतले होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यानंतर त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली. यानंतर त्याची प्रतिकारशक्ती कमी होत गेली. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की कोरोनाने असे रुप धारण केले की ते इतरांना संक्रमित करत नव्हते. या व्यक्तीवर केलेला केस स्टडी आता बार्सिलोना येथे होणाऱ्या ESCMID ग्लोबल काँग्रेसमध्ये सादर केला जाईल.

अभ्यासात असेही म्हटले आहे की, अमेरिकेत कोरोना झालेल्या 24 टक्के लोकांना किमान तीन महिने त्याची लक्षणे जाणवत राहिली. काही दिवसांपूर्वी एम्सच्या एका तज्ज्ञाने दावा केला होता की, कोरोनानंतर लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, त्यामुळे सर्दी, ताप आणि त्वचाविकार वाढले आहेत. आता ते लवकर बरे होत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT