Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक.. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर भारत अलर्ट मोडवर!

Coronavirus: तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के लोकसंख्या कोरोनाला बळी पडेल.
corona virus
corona virusDainik Gomantak

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता भारत सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया  (Mansukh Mandaviya)  आज कोरोनाबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. 

'आंतरराष्ट्रीय परिस्थिती' लक्षात घेऊन मनसुख मांडविया यांनीसकाळी 11.30 वाजता कोरोना महामारीवर बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष विभाग, आरोग्य विभाग, फार्मास्युटिकल्स, बायोटेक्नॉलॉजी, आयसीएमआरचे महासंचालक राजीव बेहर, नीति आयोगाचे सदस्य यांच्यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित राहू शकतात. 

मंगळवारी म्हणजेच 20 डिसेंबरला आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या नोंद झालेल्या प्रकरणांचे नमुने INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगितले. यावरून कोरोनाची नवा व्हेरियंट तर आला नाही ना हे समजेल. दुसरीकडे, जर नवीन प्रकार समोर आला, तर त्याचा मागोवा घेता येईल.

  • चीनमध्ये या विषाणूचे संकट

चीनमध्ये कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महामारी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के लोकसंख्या कोरोना विषाणूला बळी पडतील. यासोबतच वेगाने पसरणाऱ्या संसर्गामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही सांगण्यात आले. चीनमधून समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहांचा ढीग दिसत होता. एकाच वेळी सुमारे वीस मृतदेह जमिनीवर दिसले. शवागार पूर्ण भरल्यावर मृतदेह हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये हलवण्यात आले. तसेच अंत्यविधी गृहात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास बराच वेळ लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com