Saridewi Djamani Dainik Gomantak
ग्लोबल

Singapore: 31 ग्रॅम हेरॉईनची तस्करी अन् सिंगापूरमध्ये 19 वर्षांत 'असे' पहिल्यांदाच घडले

Singapore: सिंगापूरच्या कायद्यात 500 ग्रॅमपेक्षा जास्त गांजा आणि 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइनची तस्करी केल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

Ashutosh Masgaunde

Singapore Hangs First Woman In 19 Years for Trafficking Of Heroin:

सिंगापूरमध्ये एका महिलेने असा गुन्हा केला जो तिला फाशीपर्यंत घेऊन गेला. सिंगापूरमध्ये 19 वर्षांत पहिल्यांदाच एका महिलेला फाशी देण्यात आली आहे. यादरम्यान आजपर्यंत इतर कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते.

यापूर्वी 2004 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी येन मे वोन या महिलेला सिंगापूरमध्ये फाशी देण्यात आली होती.

ही महिला अंमली पदार्थांच्या तस्करीत दोषी आढळली. सिंगापूरमध्ये अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. दोषी ठरल्यानंतर महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा रद्द करण्याचे आवाहन करूनही सिंगापूरने 19 वर्षांत प्रथमच एका महिलेला अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी फाशीची शिक्षा दिली. श्रीदेवी जमानी (Saridewi Djamani) असे या महिलेचे नाव आहे.

अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात या आठवड्यातील ही दुसरी फाशीची शिक्षा आहे. पुढील आठवड्यात दुसऱ्या एका आरोपीला फाशीची शिक्षा होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

सिंगापूरच्या सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सने सांगितले की, 45 वर्षीय सारीदेवी डिजमानी यांना 2018 मध्ये सुमारे 31 ग्रॅम डिमॉर्फिनच्या (हेरॉईन) तस्करीसाठी शिक्षा सुनावण्यात आली.

सिंगापूर मध्ये नुकतेच हेरॉईनच्या तस्करीच्या दोषी महिलेला फाशी दिली. तिला फासावर लटकवण्याआधी तिचे कुटुंबीय तिच्या माफीसाठी आवाहन करताना.

15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइनची तस्करी केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद

या महिलेला 31 ग्रॅम डायमॉर्फिनसह तस्करी करताना पकडण्यात आले. त्यामुळेच तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

सिंगापूरच्या कायद्यात 500 ग्रॅमपेक्षा जास्त गांजा आणि 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइनची तस्करी केल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

डिजमानी यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या दोन दिवस आधी, मोहम्मद अझीझ हुसैन (56) याला सुमारे 50 ग्रॅम हेरॉइनच्या तस्करीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्यात आली.

या आठवड्यात आणखी अनेक ड्रग्ज तस्करांना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे.

अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सिंगापूर सरकारला दमानी यांना माफ करत तिची फाशीची शिक्षा रद्द करण्याचे आवाहन केले.

चीन, इराण आणि सौदी अरेबियासह सिंगापूर जगातील चार देशांपैकी एक आहे. ज्यांनी गेल्या वर्षी अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी कैद्यांना फाशी देण्यात देण्यात आली आहे.

सिंगापूरच्या धोरणावर टीका

अनेक माणवी हक्क संघटनांचे म्हणणे आहे की, सिंगापूरचे कठोर धोरण केवळ छोट्या आणि किरकोळ तस्करांना शिक्षा करते. ज्यामध्ये समाजातील मागास लोकांचा समावेश मोठा आहे.

ते म्हणतात की शेजारच्या थायलंडने गांजाला कायदेशीर मान्यता दिली आहे तर मलेशियाने या वर्षी गंभीर गुन्ह्यांसाठी असलेली फाशीची शिक्षा संपवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT