Australia: वाढत्या गॅसच्या किंमतीवर ऑस्ट्रेलियाने शोधला नवा पर्याय

Australia: यामध्ये नवीन शाळा, रुग्णालये, पोलीस स्टेशन आणि इतर सरकारी मालकीच्या इमारतींचा समावेश आहे.
Gas Cylinder
Gas Cylinder Dainik Gomantak
Published on
Updated on

Australia: संपूर्ण जगभरात दिवसेंदिवस इंधनाच्या किंमती वाढत आहे. परिणामी गॅसच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत असून गॅससाठी पर्यायी व्यवस्थेचा शोध घेतला जात आहे.

जगभरातील विविध देश यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.आता ऑस्ट्रेलियातील एका राज्याने आपल्या नागरिकांवरील महागाईचा बोजा कमी करण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहीती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियातील हे व्हिक्टोरिया राज्य आहे. व्हिक्टोरिया राज्य सरकारने आपल्या नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 2024 पर्यंत नवीन घरांसाठी गॅस कनेक्शन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

व्हिक्टोरियन सरकारने अलीकडेच एका निवेदनात म्हटले होते की, '1 जानेवारी 2024 पासून नवीन घरे फक्त इलेक्ट्रिक नेटवर्कशी जोडले जातील. सर्व नवीन सार्वजनिक इमारती पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील.

यामध्ये नवीन शाळा, रुग्णालये, पोलीस स्टेशन आणि इतर सरकारी मालकीच्या इमारतींचा समावेश आहे. व्हिक्टोरियाने इलेक्ट्रिकरणासाठी अनेक अनुदान आणि प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरू केले आहेत.

ज्यामध्ये सौर उपकरणे आणि उष्णता पंपांची किंमत कमी करण्यासाठी 10 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर ($6.7 दशलक्ष) आणि नवीन उपकरणांवर व्यापार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी 3 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरच्या पॅकेजचा समावेश आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, जगभरातील गॅसच्या वाढत्या किमती आणि त्याच्या पुरवठ्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरियामध्ये गॅसचा सर्वाधिक वापर केला जातो, ज्यामध्ये सुमारे 80 टक्के घरे जोडलेली आहेत, तर राज्याचा उत्सर्जनाकत गॅस क्षेत्राचा सुमारे 17 टक्के वाटा आहे.

Gas Cylinder
Anju Nasrullah Love Story: 'कुठे फ्लॅट, कुठे प्लॉट...' अंजू फातिमा बनताच कंगाल पाकिस्तानात गिफ्टचा वर्षाव

राज्यमंत्री लिली डी'अ‍ॅम्ब्रोसिओ म्हणाल्या, 'आम्हाला माहीत आहे की, येणार्‍या प्रत्येक बिलाबरोबर गॅस आणखी महाग होईल. म्हणूनच आम्ही अधिकाधिक व्हिक्टोरियन लोकांना त्यांच्या ऊर्जा बिलांवर ऊर्जा आणि संसाधनांसाठी सर्वोत्तम डील मिळविण्यात मदत करण्यासाठी पावले उचलत असल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याने घेतलेला निर्णाय आता यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com