Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासची लोकप्रियता वाढली; 90 टक्के लोकांनी केली महमूद अब्बास यांच्या राजीनाम्याची मागणी

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. यादरम्यान, एक ओपिनियन पोल घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या घनघोर युद्ध सुरु आहे. यादरम्यान, एक ओपिनियन पोल घेण्यात आला आहे, ज्यामध्ये हमासला पाठिंबा देणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासाठी निराशाजनक निकाल समोर आले आहेत. जवळपास 90 टक्के लोकांनी अब्बास यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे. दुसरीकडे मात्र, अब्बास यांना पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. हे सर्वेक्षण पॅलेस्टिनी एजन्सीने केले आहे.

दरम्यान, अमेरिकेने (America) वेस्ट बँक स्थित अब्बास यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी प्राधिकरणाला गाझावर नियंत्रण आणि राज्य करण्याचे आवाहन केले आहे. यूएस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. मात्र, याचा अर्थ नेतृत्व बदल होईल का, हे त्यांनी सांगितले नाही. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकच्या काही भागांवर PA चे शासन आहे.

दुसरीकडे, 2007 मध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी ते ताब्यात घेईपर्यंत संपूर्ण पॅलेस्टाईनवर राज्य केले. संसदीय निवडणुकीत हमासला (Hamas) बहुमत मिळाल्यानंतर 2006 पासून कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझामधील पीएसाठी कोणतीही भूमिका ठामपणे नाकारली आहे. इस्रायलने तिथे खुली सुरक्षा नियंत्रणे ठेवली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला आहे. त्याचवेळी, अमेरिकेच्या अरब मित्र राष्ट्रांनी म्हटले आहे की, टू स्टेटसाठी विश्वासार्ह पुढाकार असेल तरच ते युद्धानंतरच्या पुनर्रचनेत सामील होतील.

तसेच, सर्वेक्षणाचे परिणाम PA च्या मागणीला मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे. पोलस्टर खलील शिकाकी यांनी सांगितले की, ''युद्धानंतर गाझा इस्रायलच्या ताब्यात जाईल. इस्रायल गाझामध्ये अडकला आहे." शिकाकी यांनी असोसिएटेड प्रेसच्या पॅलेस्टिनी सेंटर फॉर पॉलिसी अँड सर्व्हे रिसर्च किंवा पीएसआरच्या सर्वेक्षणाचे निकाल प्रकाशित करण्यापूर्वी हे वक्तव्य केले होते.

इस्रायल गाझामधून एकतर्फी माघार घेण्याचा निर्णय घेऊ शकतो, परंतु इस्रायलने गाझा पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. 22 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत वेस्ट बँक आणि गाझामधील 1,231 लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये 4 टक्क्यांचे मार्जिन होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

Shubman Gill Injury Update: शुभमन गिल खेळणार की नाही? भारतीय संघासमोर पेचप्रसंग; तंदुरुस्ती चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष

Goa Politics: 'सरदेसाईंसारखा सिंह माझ्या पाठीशी'! खोर्लीसाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार जाहीर; ‘डबल इंजिन’कडून लूट झाल्याचे आरोप

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

SCROLL FOR NEXT