Hibatullah Akhundzada Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानने रचलेल्या 'त्या' कटात तालिबानी प्रमुखाचा मृत्यू

तालिबानने (Taliban) आता आपला सर्वोच्च नेता हैबतुल्लाह अखुंदजादा ठार झाल्याची पुष्टी केली आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी (Taliban) धर्मावर आधारीत अशी सत्ता स्थापन केली. सरकारचा प्रमुख म्हणून हैबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) घोषित करण्यात आले होते. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालिबानने आता आपला सर्वोच्च नेता हैबतुल्लाह अखुंदजादा ठार झाल्याची पुष्टी केली आहे. माध्यमाला मिळालेल्या माहितीनुसार, 2016 पासून तालिबानचा प्रमुख असलेला अखुंदजादा 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात मारला गेला. तालिबानचे वरिष्ठ नेते अमीर-अल-मुमिनिन यांनी म्हटले की, पाकिस्तानी सैन्यांच्या आत्मघाती हल्ल्यात हैबतुल्लाह अखुंदजादा "शहीद" झाले होते. यापूर्वी कळविण्यात आले होते की, अखुंदजादा एकतर पाकिस्तानच्या ताब्यात आहे किंवा पाकिस्तानी सैन्याने त्याला मारले.

तालिबानी राजवट आल्यापासून...

खरं तर, तालिबानने ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून, अखुंदजादाबद्दल अनेक अटकळ्या लावल्या जात होत्या. दुसरीकडे तालिबानकडून वारंवार म्हटले जात होते की, अखुदंजादा जिवंत असून तो लवकरच सार्वजनिकपणे जगासमोर येईल. प्रत्यक्षात, हैबतुल्लाह अखुंदजादा आजपर्यंत कधीही लोकांसमोर आला नाही. तो पडद्यामागेच कार्यरत होता. न्यूयॉर्क पोस्टच्या होली मॅक केच्या मते, इंटरनेटवर अखुंदजादाचे फोटोही जुना आहे.

तालिबान नेत्यांमध्येही अफवा पसरल्या होत्या

आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली असून, अफगाण लोक त्यांच्या सार्वजनिक दहशतीखाली जगत आहेत. परंतु अफगाणिस्तानमध्ये अखुंदजादाच्या मृत्यूबाबत अनेक अफवांच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या. तालिबान नेत्यांमध्येही अफवा पसरु लागल्या की अखुंदजादा जिवंत नाही? 2016 मध्ये अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात तालिबान प्रमुख अख्तर मन्सूरला ठार केले. यानंतर अखुंदजादाला मन्सूरचा उत्तराधिकारी बनवण्याची घोषणा करण्यात आली होती. अखुंदजादा कंधारचे कट्टर धार्मिक नेते होते. लोक त्याला लष्करी कमांडरपेक्षा धार्मिक नेता म्हणून अधिक ओळखत होते. असे म्हटले जात होते की, अखुंदजादा यांनीच इस्लामिक शिक्षा सुरु केली होती. ज्या अंतर्गत तो खुलेआम खून किंवा चोरी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देत असे. याशिवाय तो अनेक फतवेही काढायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT