Hafiz Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

हाफिज सईदला 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, पाकिस्तानी न्यायालयाचा मोठा निर्णय

दहशतवादी हाफिज सईदला 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला एका प्रकरणात 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हाफिज सईद (Hafiz Saeed) हा बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) प्रमुखही आहे. त्याचबरोबर तो मुंबई (Mumbai) हल्ल्याचा मुख्य सूत्रधारही आहे. 3.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, हाफिज सईदविरोधातील न्यायालयाचा हा आदेश अशा वेळी आला आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये राजकीय संकट गडद होत चालले आहे. इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची गेली, पण पुढे सार्वत्रिक निवडणुका होतील की विरोधी पक्षांच्या महाआघाडीतून शाहबाज शरीफ पंतप्रधान होतील, यावर अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज सईदने बांधलेले मदरसे आणि मशिदीही सरकारी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहेत. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज लोणी यांनी सांगितले की, 'सुनावणी पूर्ण होताच कठोर शिक्षेची घोषणा केली.' पाकिस्तानच्या सीआयडीने हाफिज सईद आणि इतरांवर दहशतवाद आणि निधी पुरवल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. याआधीही विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली आहे, मात्र बहुतांश वेळा त्याने उच्च न्यायालयातून दिलासा मिळवला होता. यापूर्वी, 2020 मध्ये, हाफिज सईदला दहशतवादी फंडिंग प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 70 वर्षीय हाफिज सईदवर दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याप्रकरणी अनेक खटले सुरु आहेत.

मात्र, पाकिस्तानमध्ये 26/11 चे प्रकरण अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या घटनेला 14 वर्षे उलटूनही मुंबई हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणी हाफिज सईद, झकी उर रहमान लख्वी यांसारख्या बड्या लष्कर कमांडरांवर कारवाई करण्यात पाकिस्तानला अपयश आले आहे. तर दुसरीकडे, भारताने पाकिस्तानला अनेकवेळा मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला लवकर चालवण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, मुंबई हल्ल्यात अमेरिका, इस्रायलसह अनेक देशांच्या नागरिकांसह 175 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्यादरम्यान प्रसिद्ध ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनलसह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. यामध्ये अजमल कसाब (Ajmal Kasab) या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले. नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT