Google Employees Dainik Gomantak
ग्लोबल

'मी चाललो, हा घ्या राजीनामा'; कंपनीने पगारात 300 टक्के वाढ करुन कर्मचाऱ्याला थांबवले

Google Employees: कोविड दरम्यान आणि नंतर, तुम्ही टेक ऑफ हा शब्द नक्कीच ऐकला असेल.

Manish Jadhav

Google Employees: कोविड दरम्यान आणि नंतर, तुम्ही टेक ऑफ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. या इंग्रजी शब्दाचा अर्थ ले-ऑफ असा होतो आणि हा ले-ऑफ केवळ छोट्या कंपन्यांनीच नाही तर मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही केला होता. ज्यामध्ये गुगल, फेसबुक आणि ॲमेझॉनसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश होता. पण सध्या गुगलची एक बातमी चर्चेत आहे. जिथे त्याने आपल्या कर्मचाऱ्याला रोखण्यासाठी अशी ऑफर दिली की जी जाणून तुम्हीही अवाक व्हाल...

दरम्यान, गुगलमध्ये काम करणाऱ्या लोकांना माहीत आहे की इथे त्यांना एवढा कंफर्ट मिळतो की कर्मचाऱ्याला इच्छा असूनही नोकरी सोडता येत नाही, तरीही एखाद्याला सोडायची असेल तर गुगल आपल्या कर्मचाऱ्याला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. आता हे प्रकरण बघा जिथे गुगलने आपल्या कर्मचाऱ्याला कायम ठेवण्यासाठी 300 टक्के वेतनवाढ दिली आहे. कंपनीच्या सीईओने याचा खुलासा केला आहे.

गुगलने हे का केले?

परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी बिग टेक्नॉलॉजी पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली. जिथे त्यांनी सांगितले की, ''आम्ही गुगलमध्ये नव्या व्यक्तीला हायर करण्याचा विचार केला. आम्ही त्याला चांगली ऑफरही दिली. पण गुगल कोणत्याही किंमतीत आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून जाऊ देत नाही. अशा परिस्थितीत गुगलने त्याला एवढी मोठी पगारवाढ दिल्याने मला आश्चर्य वाटले.''

दरम्यान, ही बातमी धक्कादायक आहे कारण गेल्या वर्षीच गुगलने 12,000 लोकांना कामावरुन काढून टाकले होते. एकीकडे गुगल टाळेबंदी करत आहे आणि दुसरीकडे एवढी मोठी पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांना जाऊ देत नाही. याबाबत अरविंद श्रीनिवास म्हणाले की, टेक कंपन्या या गोष्टीबाबत थोड्या गंभीर आहेत. त्यांच्या एका खास कर्मचाऱ्याने दुसऱ्या कंपनीत जाऊ नये कारण इतर कंपन्यांना याचा थेट फायदा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT