Google Doodle Dainik Gomantak
ग्लोबल

Google Doodle: भारताच्या पहिल्या शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त गूगलने बनवले खास डूडल

गूगलने आज भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त खास डूडल बनवले आहे.

Puja Bonkile

Google Doodle: गूगलने आज भारतीय शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांची 112 वी जयंती साजरी करत आहे. यानिमित्ताने आज गुगलने कमला सोहनी यांच्याशी संबंधित खाल डूडलही बनवले आहे. 

कमला सोहोनी या भारतातील पहिल्या महिला होत्या ज्यांनी विज्ञानात पीएचडी पदवी मिळवली आणि शास्त्रज्ञ बनल्या. कमला सोहोनी यांनी दिलेल्या योगदानाचा आज गुगल डूडलद्वारे गौरव करत आहे. 

देशातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी या भारतातील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर (IISc) मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. IISc ही देशातील सर्वोत्तम संस्था मानली जाते. सोहोनी पीएचडी करणारी पहिली भारतीय महिला देखील ठरली, जी महिलांसाठी एक सन्मानाची गोष्ट होती.

  • राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला 

कमला सोहोनी यांना त्यांच्या "नीरा" वरील कामासाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्या बॉम्बे मधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या पहिल्या महिला संचालक होत्या. 

सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला होता. त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केला, 1933 मध्ये त्यांच्या वर्गात उच्च पदवी घेतली.

  • कमला सोहोनी यांनी महत्त्वाचे संशोधन केले

कमला सोहोनी यांना केंब्रिज विद्यापीठात संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. येथे त्यांनी सायटोक्रोम सी चा महत्त्वाचा शोध लावला. जो वनस्पतींच्या सर्व पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी एक महत्त्वाचा एन्झाइम मानला जातो. या शोधावर त्यांनी पीएचडीचा थीसिस पूर्ण केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT