Twitter | Elon Musk
Twitter | Elon Musk Dainik Gomantak

एलन मस्कची मोठी घोषणा, Twitter वर लवकरच स्मार्ट टीव्हीसाठी Video App करणार लाँच

ट्विटर लवकरच स्मार्ट टीव्हीसाठी व्हिडिओ अॅप लाँच करणार आहे.
Published on

Elon Musk: एलन मस्कने पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. ट्विटर लवकरच स्मार्ट टीव्हीसाठी व्हिडिओ अॅप लाँच करणार आहे. याची माहिती स्वत: एलन मस्क यांनी ही माहिती दिली आहे.

ट्विटरवर SM रॉबिन्सन नावाचे अकाउंट असलेल्या  एका युजरने म्हटले की , “आम्हाला खरोखरच स्मार्ट टीव्हीसाठी ट्विटर व्हिडिओ अॅपची आवश्यकता आहे. मी ट्विटरवर एक तासाचा व्हिडिओ पाहत नाही. यावर मस्कने उत्तर दिले, "ते लवकरच लाँच होणार आहे."

दरम्यान, कंपनी विकत घेतल्यानंतर एलन मस्कने ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यापैकी एक सोशल मीडिया व्हिडिओ आहे. याआधी ट्विटरने आपल्या व्हेरिफाईड यूजर्सना 2 तासांचा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा दिली होती.  मस्कने म्हटले होते की ट्विटर ब्लू व्हेरिफाईड वापरकर्ते आता 2 तासांचे व्हिडिओ (8GB) अपलोड करू शकतात.

Twitter | Elon Musk
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या आजच्या किमती

यापूर्वी, एलन मस्क म्हणाले होते की ट्विटरला जाहिरातींसाठी निर्मात्यांना लवकरच USD 5 दशलक्ष द्यावे लागतील. मस्क यांनी शनिवारी ट्विट केले की काही आठवड्यांत, X/Twitter निर्मात्यांना त्यांच्या उत्तरांमध्ये ठेवलेल्या जाहिरातींसाठी पैसे देणे सुरू करेल.

यूएस-आधारित टेक पोर्टल टेकक्रंचच्या मते, ट्विटरने आपल्या सशुल्क योजना बदलल्या आहेत आणि 60 मिनिटांची पूर्वीची मर्यादा दोन तासांपर्यंत वाढवली आहे. कंपनीने आपले ट्विटर ब्लू पेज देखील सुधारित केले आणि सांगितले की सशुल्क वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ फाइल आकार मर्यादा आता 2GB वरून 8GB पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

पूर्वी बऱ्याच काळापासून व्हिडिओ अपलोड करणे केवळ वेबवरून शक्य होते, परंतु आता ते iOS अॅपद्वारे देखील शक्य आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार पलोडसाठी कमाल गुणवत्ता अजूनही 1080p वरच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com