Golden Globes 2025 Winners: जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. 82 व्या गोल्ड ग्लोब पुरस्काराचे कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन येथे आयोजन करण्यात आले होते, जिथे विजेत्यांची घोषणा करण्यात आली. 'एमिलिया पेरेझ'ने सर्वाधिक नामांकनांसह आघाडी घेतली. (एकूण 10), इतर नामांकनांमध्ये 'द बेअर', 'शोगुन', 'विक्ड' आणि 'चॅलेंजर्स' यांचा समावेश आहे. भारताची एकमेव आशा पायल कपाडिया यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ने लावून धरली होती. मात्र 'एमिलिया पेरेझ'ने बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकल्याने भारतीय चाहत्यांची निराशा झाली.
भारतातही (India) या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, कारण दिग्दर्शिका पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाला दोन कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले होते. पण भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. हा चित्रपट दोन्ही कॅटेगरीतून बाहेर पडला. नॉन इंग्लिश फिल्म कॅटेगरीमध्ये फ्रेंच म्युझिकल क्राइम कॉमेडी चित्रपट एमिलिया पेरेझने बाजी मारली. ब्रॅडी कॉर्बेटने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा किताब पटकावला. चला तर मग विलंब न करता यंदाचे गोल्डन ग्लोब विजेते अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट आणि दिग्दर्शक यांची सविस्तर यादी पाहूया...
Golden Globe Awards 2025 Winners List:
बेस्ट पिक्चर- म्युझिकल/कॉमेडी- Emilia Perez
बेस्ट पिक्चर- ड्रामा- The Brutalist
बेस्टर मेल एक्टर मोशन पिक्चर- ड्रामा- Adrien Brody (The Brutalist साठी)
बेस्ट फीमेल एक्टर मोशन पिक्चर- ड्रामा- Fernanda Torres (I'm Still Her साठी)
बेस्ट ड्रामा सीरीज- Shogun
बेस्ट टीव्ही फीमेल एक्टर ड्रामा सीरीज- Anna Sawai (Shogun साठी)
बेस्ट म्युझिकल/कॉमेडी सीरीज- Hacks
बेस्ट मेल एक्टर- लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज आणि टीव्ही मोशन पिक्चर- Baby Reindeer
सिनेमॅटिक अॅण्ड बॉक्स ऑफिस अचीव्हमेंट- Wicked
बेस्ट सॉन्ग- मोशन पिक्चर- "El Mal' (Emilia Perez साठी)
म्यूझिक कुणी दिलं- Clement Ducol, Camille
लिरिक्स- Clement Ducol, Camille, Jacques Audiard
बेस्ट स्कोर मोशन पिक्चर- Trent Reznor & Atticus Ross ('चैलेंजर्स' साठी)
बेस्ट डायरेक्टर मोशन पिक्चर- Brady Corbet (The Brutalist साठी)
बेस्ट एनिमेटेड मोशन पिक्चर- Flow
बेस्ट मेल एक्टर मोशन पिक्चर- म्युझिकल/कॉमेडी- Sebastian Stan ('द डिफरेंट मॅन' साठी)
बेस्ट फीमेल एक्टर मोशन पिक्चर- म्युझिकल/कॉमेडी- Demi Moore (The Substance साठी)
बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर- टीव्ही- Tadanobu Asano
बेस्ट सपोर्टिंग फीमेल एक्टर- टीव्ही- Jessica Gunning (Baby Reindeer साठी)
बेस्ट टीव्ही फीमेल एक्टर लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज आणि टीव्ही मोशन पिक्चर- Jodie Foster (ट्रू डिटेक्टिव: नाइट कंट्री साठी)
बेस्ट टीवी मेल एक्टर लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज आणि टीव्ही मोशन पिक्चर- Colin Farrell (द पेंग्वुइन साठी)
बेस्ट पिक्चर- नॉन इंग्लिश- Emilia Perez (फ्रान्स)
बेस्ट टीवी मेल एक्टर- ड्रामा सारीज- Shogun साठी Hiroyuki Sanada
बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर- मोशन पिक्चर- Kieran Culkin
बेस्ट स्टॅंड-अप कॉमेडियन ऑन टीव्ही- Ali Wong
बेस्ट स्क्रीनप्ले- मोशन पिक्चर- Peter Straughan (कॉन्क्लेव)
बेस्ट टीवी मेल एक्टर म्युझिकल/कॉमेडी सीरीज- Jeremy Allen White
बेस्ट टीव्ही फीमेल एक्टर- म्युझिकल/कॉमेडी सीरीज- Jean Smart
बेस्ट सपोर्टिंग एक्टर- टीव्ही Tadanobu Asano (Shogun)
बेस्ट सपोर्टिंग फीमेल एक्टर- मोशन पिक्चर- Zoe Saldana
बेस्ट टीव्ही मेल एक्टर- ड्रामा सीरीज- Hiroyuki Sanada (Shogun साठी)
बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर- मोशन पिक्चर- Kieran Culkin (ए रियल पेन साठी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.