Antarctica Global Warming Dainik Gomantak
ग्लोबल

Global Warming: "हे तर असामान्य"; अंटार्क्टिकातील हवामान बदलांवर शास्त्रज्ञही चकीत

Global Warming: दरवर्षी उन्हाळ्यात अंटार्क्टिका समुद्राचा बर्फ फेब्रुवारीच्या शेवटी वितळतो. मग हिवाळ्यात परत गोठतो, पण यावर्षी शास्त्रज्ञांना काही वेगळेच पाहायला मिळाले.

Ashutosh Masgaunde

Sea Ice of Antarctica is at its lowest level ever: 2023 मध्ये सतत उष्णतेच्या विविध घटना पाहायला मिळत आहेत. उत्तर गोलार्ध तीव्र उष्णतेची लाट पाहत आहे तर दक्षिणेकडे आणखी एक तीव्र हवामान बदल नोंदवला जात आहे.

या घटनेचे वर्णन काही शास्त्रज्ञांनी असामान्य असे केले आहे. लाखो वर्षांनंतर अशी घटना पाहायला मिळते, असे ते म्हणाले.

यावर्षी अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण अभूतपूर्व पातळीपर्यंत खाली आले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसांपासून बर्फ वितळू लागतो. हिवाळ्यात बर्फ पुन्हा गोठतो.

पण यावर्षी शास्त्रज्ञांना खूप खास गोष्ट पाहायला मिळाली. समुद्राचा बर्फ जेवढा वितळला होता, तेवढा हिवाळ्यात वाढला नाही.

दरवर्षी बर्फ वितळतो

विशेष म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यात अंटार्क्टिकाचा समुद्राचा बर्फ फेब्रुवारीच्या शेवटी वितळतो. मग हिवाळ्यात ते परत गोठते, पण यावर्षी शास्त्रज्ञांना काही वेगळेच पाहायला मिळाले. समुद्रातील बर्फ अपेक्षित पातळीच्या जवळपासही नाही.

45 वर्षांनंतर बदल

गेल्या 45 वर्षांत अंटार्क्टिका समुद्रात खूप बदल झाले आहेत. समुद्रातील बर्फ इतक्या खालच्या पातळीवर गेल्याची अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

लीकडच्या काळात, त्याच्या घटण्याचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. नॅशनल स्नो अँड आइस डेटा सेंटर (NSIDC) च्या आकडेवारीनुसार, 2022 पेक्षा बर्फ 1.6 दशलक्ष चौरस किलोमीटर (0.6 दशलक्ष चौरस मैल) कमी आहे.

कारण

शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, बर्फाच्या वितळण्याच्या प्रक्रियेतील ही धक्कादायक घसरण या बर्फाळ प्रदेशावर हवामान संकट अधिक गंभीरपणे परिणाम करत असल्याचे लक्षण आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे याचे सर्वात मोठे कारण आहे.

इतक्या क्षेत्रावर बर्फ वितळला

या वर्षी जुलैच्या मध्यात अंटार्क्टिकाचा समुद्रातील बर्फ 1981-2010 च्या सरासरीपेक्षा 2.6 दशलक्ष चौरस किलोमीटर (1 दशलक्ष चौरस मैल) कमी होता. हे क्षेत्र अंदाजे अर्जेंटिना किंवा टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू मेक्सिको, ऍरिझोना, नेवाडा, उटाह आणि कोलोरॅडोच्या एकत्रित प्रदेशाइतके मोठे आहे.

शास्त्रज्ञांचे निरिक्षण

या घटनेचे वर्णन काही शास्त्रज्ञांनी असामान्य असे केले आहे. लाखो वर्षांनंतर अशी घटना पाहायला मिळते, असे ते म्हणाले.

कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील ग्लेशियोलॉजिस्ट टेड स्कॅम्बोस यांनी सांगितले की, ही साधी घटना नाही. हवामान सतत बदलत आहे. शास्त्रज्ञ आता हे का होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

अंटार्क्टिकामधील वाढत्या हवामान संकटामुळे समुद्रातील बर्फ सतत वितळत आहे. अंटार्क्टिकामधील समुद्रातील बर्फ गेल्या काही दशकांमध्ये विक्रमी उच्चांकावरून विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना (Global warming) जागतिक तापमानवाढीला कसा प्रतिसाद मिळतो हे समजणे कठीण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT