crime News  Dainik Gomantak
ग्लोबल

लाईव्ह लोकेशन ट्रेस करत रंगेहाथ दोघांना पकडलं; प्रियसीला राग अनावर

प्रियकराच्या अंगावर प्रियसीने घातली तीन वेळा कार

दैनिक गोमन्तक

जगभरात प्रेमी युगल एकमेकांसाठी खुप काही करताना आपण पाहीलं वाचलं असेल. तसंच प्रेम प्रकरणातून अनेकांनी जीवन संपवल्याचं ही समोर आलं आहे. अशीच धक्कादायकबाब अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात घडली आहे. प्रेमात फसवणूक झालेल्या तरुणीने प्रियकराची निर्घृण हत्या केली. हत्या करण्यासाठी तिने बॉयफ्रेंडच्या अंगावर 3 वेळा कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Girlfriend puts car on boyfriend's body )

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. या तरुणीने दुसऱ्या एका युवतीला मारण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. 'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीत मॉरिसला नामक युवतीला तिच्या बॉयफ्रेंडचे इंडियाना पोलिसमधील लोकेशन सापडलं. तेव्हा स्मिथ हा तीचा बॉयफ्रेंड एका पबमध्ये होता. आणि त्याच्यासोबत दुसरी गर्लफ्रेंड होती.

मॉरिसलाच्या म्हणन्यानुसार स्मिथ तिची फसवणूक करत होता. इंडियानापोलिस मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाच्या तपासकर्त्यांनी सांगितलं की, जेव्हा मॉरिस तिथे आली तेव्हा तिने प्रियकर आंद्रे स्मिथसोबत भांडण सुरू केलं. वाद सुरू असताना मॉरिसने दारूच्या रिकाम्या बाटलीने स्मिथसोबतच्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

स्मिथने हा हल्ला रोखला आणि या तरुणीच्या हत्येचा मॉरिसचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यानंतर तिघांना पबमधून बाहेर काढण्यात आलं. पबमधून बाहेर येताच मॉरिस आपल्या कारमध्ये बसली आणि रस्त्यावरुन चाललेल्या आंद्रेला तिने कारने धडक दिली. ती आंद्रेला तोपर्यंत गाडीखाली चिरडत राहिली, यात त्याचा जीव गेला नसला तरी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिसने आंद्रेच्या अंगावर तीन वेळा कार चढवली आणि उतरवली आहे. त्यामूळे प्रेमात असताना व्यक्ती कीती टोकाला जाऊ शकते याचं आणखी एक उदाहरण जगासमोर आलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT