Ghislaine Maxwell Dainik Gomantak
ग्लोबल

मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी ब्रिटनच्या प्रसिध्द महिलेला 20 वर्षांची शिक्षा

दैनिक गोमन्तक

Ghislaine Maxwell Mentenced: मुलींचे लैंगिक शोषण करण्यास मदत केल्याप्रकरणी घिसलीन मैक्सवेलला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यूयॉर्क न्यायालयाने त्यांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दीर्घकाळ चाललेल्या खटल्यानंतर मॅनहॅटन फेडरल न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याचा अर्थ 60 वर्षीय मॅक्सवेल त्यांच्या उर्वरित आयुष्यातील बहुतांश काळ तुरुंगात घालवणार आहेत. (Ghislaine Maxwell Sentenced 20 Years Prison Over Sex Trafficking New York Court)

5 प्रकरणांमध्ये दोषी

घिसलेन मॅक्सवेल या ब्रिटनमधील (Britain) एक प्रभावशाली महिला आहेत. त्या रॉबर्ट मॅक्सवेल यांची मुलगी आहे. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीसह आणलेल्या 6 पैकी 5 प्रकरणांमध्ये त्या दोषी आढळल्या आहेत. प्रियकर एपस्टाईनला मदत केल्याप्रकरणी घिसलेन मॅक्सवेल यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

न्यायालयात दाद मागितली

मात्र, मॅक्सवेल यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे शिक्षा कमी करण्यासंबंधी अपील केले. त्यानंतर न्यायमूर्ती अ‍ॅलिसन नाथन यांनी यूएस प्रोबेशन ऑफिसने सुचवलेल्या शिक्षेवर विचार करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी या प्रकरणात सरकारी वकिलांनी 30 ते 55 वर्षांच्या शिक्षेची मागणी न्यायालयाकडे (Court) केली होती.

कायद्याच्या वर कोणीही नाही

न्यू यॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे अमेरिकन वकील डॅमियन विल्यम्स यांनी सांगितले की, 'आजच्या शिक्षेमुळे घिसलेन मॅक्सवेलला मुलांविरुद्धच्या जघन्य गुन्ह्यांसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. कायद्याच्या वर कोणीही नाही आणि न्यायासाठी कधीही उशीर झालेला नाही.'

मॅक्सवेलला 2020 मध्ये अटक करण्यात आली होती

मॅक्सवेलला 2020 मध्ये अटक करण्यात आली असून तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या एपस्टाईनने न्यूयॉर्कमध्ये केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्याच्या प्रतीक्षेत असताना 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या केली. त्याच वेळी, मॅक्सवेलच्या वकिलांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की, 'एपस्टाईनच्या मृत्यूचा मॅक्सवेलच्या केसवर परिणाम होईल.'

एपस्टाईनच्या गुन्ह्यांसाठी कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही

बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, 'मॅक्सवेलला एपस्टाईच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार धरायला हवे होते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT